मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  

दारिद्रय रेषेखालील ग्रामीण कुटूंबे - माहिती विभाग

  

प्रस्तावना

ग्रामीण भागात राबविल्या जाणा-या दारिद्रय निर्मूलनाच्या विविध कार्यक्रमांतर्गत दारिद्रय रेषेखालील नोंदणी झालेल्या कुटूंबांना शासनातर्फे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अर्थेसहाय्य देण्यासाठी प्रत्येक पंचावार्षीक योजनेच्या सुरुवातीला दारिद्रय रेषेखालील कुटूंबाची गणना करुन दारिद्रय रेषेखालील कुटूंबाची यादी तयार करण्यात येते. याचा मुख्य उदेदश दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना गरिबी निर्मुलनास्तव राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांतुन मदत करणे हा आहे.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभाग , शासन निर्णय क्र. दारेग/प्रक्र 1669/योजना -1 मंत्रलय, मुंबई दिनांक 2 डिसेबर 2002 नुसार दहाव्या पंचवार्षीक योजनांच्या अंमलबजावणी करीता दारिद्रय रेषेखालील कुटूंबाची गणना करण्यात आली. दारिद्रय रेषेखालील कुटूंब गणना केंद्र शासनाने निश्चीत केलेल्या 13 निकषाच्या आधारे करण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाने निश्चीत केलेले निकष

  • कसणा-या जमिनीचा आकार
  • घराचे प्रकार
  • सरासरी कपडे परिधान व उपलब्धता
  • अन्न सुरक्षा
  • स्वच्छता
  • उपभोग्य टिकाउ वस्तूची मालकी
  • घरातील जास्त शिकलेल्या व्यक्तीचे साक्षरतेचे प्रमाण
  • कुटूंबाचा मजूर शक्तीचा दर्जा
  • उपजिवीकेचे साधन
  • मुले शाळेत जाणारी / काम करीत नसलेली.( 5 ते 14 वर्षाची कोणतीही मुले)
  • कर्जबाजारी पणाचा प्रकार
  • घरातुन स्थलांतरांचे कारण.
  • सहाय्याची पसंती आवड.

वरील निकषाच्या आधारे सदरचा सर्वे धुळे जिल्हयात पूर्ण करुन प्रत्येक ग्राम पंचायतीने ग्राम सभेत त्यांचे वाचन करुन ग्राम सभेच्या ठरावाव्दारे त्यास मंजूरी घेउन त्या यादया ग्राम पंचायतीमार्फत प्रसिध्द करण्यात आल्या होत्या.

शासनाचे अतिगुप्त पत्र क्र. दारेग/2002/प्रक्र 1664/यो-1 दि. 25-04-2003 नुसार दारिद्रय रेषेखालील सर्वेक्षणाबाबत दारिद्रय रेषेखालील कुटूंब संख्या 170060 पूर्व निश्चीत करुन दिलेली आहे. त्यानुसार धुळे जिल्हयात प्रत्येक गावासाठी 18 छाटणी गुणांक निश्चीत करुन 167273 कुटूंबे दारिद्रय रेषेखालील पात्र यादी समावेश करण्यात आला. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे

अक्र
तालुका
एकूण र्सव्हे झालेली कुटूंबे
पैकी दा.रे. खालील पात्र कुटूंबे
टक्केवारी
1
धुळे
88217
43703
59.54
2
साक्री
96262
55126
57.26
3
शिरपुर
67627
40243
59.50
4
शिंदखेडा
59681
28201
47.25
एकूण
311787
167273
53.64

शासनाकडील पत्र क्र. दारेग 2005/प्रक्र 923/दि. 29 नोव्हेबर 2006 च्या पत्रानुसार अपिलाव्दारे कुटूंबाचा यादीत समावेश करणे अथवा वगळणे ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवण्यात आलेली आहे. जनतेमध्ये दारिद्रय रेषखालील सर्वे 2002-07 बाबत जाणीव व जाग़ती होवून च्या पात्र कुटूंबाचे नांव दारिद्रय रेषेच्या सर्वेत आले नाही, त्यांनी म. तहसिलदार यांच्याकडे अर्ज करुन अर्जांसोबत कुटूंब गणना पत्रची सत्यप्रत जाेडून अपिल दाखल करणे आवश्यक आहे.

अपिल कोणाकडे करावे

कुटूंब पत्रकांच्या सत्य प्रतिसह तालुक्याचे म. तहसिलदार/ उपविभागीय अधिकारी यांचेकडे करणे आवश्यक आहे. तक्रार र्कत्यांच्या अपिलांवर तलाठी / ग्राम सेवक / विस्तार अधिकारी यांचेमार्फत पुर्नतपासणी होउन तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत छाननी करुन निर्णय घेण्यात येईल.