मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  

हरीयाली पाणलोट विकास कार्यक्रम

  

प्रस्तावना

केंद्र शासनाच्या पाणलोट विकास मार्गदर्शक सूचनेनुसार सन 1995 पासून नविन अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेत येत आहे.

पाणलोट प्रकलप अंमलबजावणीच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी आणि पंचायत राज संस्थांना नियोजन अंमलबजावणी व ग्रामीण भागातील आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी नविन हरीयाली पाणलोट विकास कार्यक्रम सुरु केलेला आहे. त्यानुसार धुळे जिल्हयात धुळे, साक्री आणि शिंदखेडा या तीन अवर्षण प्रवण क्षेत्र तालुक्यामध्ये हरीयाली पाणलोट विकास कार्यक्रम राबविणेत येत आहे.

उदिष्टे

  • शेती, बागकाम व फुलांची मशागत यांचा अंतर्भाव करुन वृक्ष लागवड, गायरानांचा विकास, मासेमारी इत्यादी कामातुन खेडयातील लोकांना सातत्यपूर्ण उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याकरीता तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याकरीता पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे.
  • ग्राम पंचायतीव्दारे ग्रामीण भागाचा संपूर्ण विकास साधणे आणि पावसाळयाच्या पाण्याच्या शेतीव्दारे आणि व्यवस्थापनाव्दारे पंचायतीना कायम स्वरुपी उत्पनाचे साधन उपलब्ध करुन देणे.
  • रोजगाराच्या संधी, दारिद्रय निर्मुलन, ग्रामीण भागातील इतर आर्थिक साधनांचा विकास.
  • ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी पिके, मानव आणि पशुधन यांच्यावर होणा-या हवामानाचा तीव्र परिस्थतीचे परिणाम उदा. दुष्काळ आणि वाळकंटीकरण इत्यादीची तीव्रता सौम्य करणे.
  • दैनंदिनी कामाबरोबर नैसर्गिक संपत्ती म्हणजे जमीन, पाणी, वृक्ष यांचे संधारण आणि सृष्टीचा समतोल राखणे.
  • नैसर्गिक संपत्तीची देखभाल करण्यासाठी खेडयातील जनतेला सातत्यपूर्ण सामुहिक कृती कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देणे आणि त्याचबरोबर पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक साधनांचा विकास साधणे.
  • सोप्या आणि परवडण्याजोग्या उपाययोजनांचा वापर करण्यासाठी उदृक्त करणे आणि स्थानिक तांत्रिक माहिती आणि उपलब्ध साधनांचा वापर करणे.

पाणलोट क्षेञ निवडीसाठी निकष

  • मजुर पैसा साधने इ. याव्दारे जनतेच्या विकासासाठी व निर्माण केलेले संपत्तीच्या देखभालीसाठी लोकांचा सहभाग असलेले पाणलोट क्षेञ.
  • पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई असलेली पाणलोट क्षेञाची जागा.
  • ज्या पाणलोट क्षेञावर मोठया प्रमाणात अनुसूचित जाती / जमातीचे लोक अवलंबून आहेत असे क्षेञ.
  • वनविरहीत पडीक जमीनी किंवा अध-पतित जमीनींना प्राधान्य देण्यात आलेले पाणलोट क्षेञ.
  • अगोदरच विकास झालेल्या पाणलोट क्षेञाच्या जवळचे पाणलोट क्षेञ.
  • सरासरी 500 हेक्टर क्षेत्र , प्रामुख्याने संपूर्ण खेडयांचा समावेश असणारे पाणलोट क्षेञ.

पाणलोट उपचार कामाचा तपशिल

  • पाणी साठविण्याच्या छोटया छोटया रचना, उदा. शेततळे, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, पाझर तलाव, खोद तळे, गाळ रोधक भिंत, मोठे दगडी बांध, ओघळ नियंञण, अरदन बांध, सलग समतलचर(सीसीटी) गबियन बांध इ.
  • पाण्याच्या साधनांमध्ये सुधारणा आणि वृध्दी, पिण्याच्या पाण्यासाठी किंवा सिंचनासाठी किंवा मासेमारी विकासासाठी गावात तळे बांधणे.
  • फलोत्पादन विकास, सावली देणा-या वृक्षांची लागवड यासह वृक्षारोपण
  • स्वंतञपणे कुरणांचा विकास साधणे.
  • जल व मृदा संधारणाबरोबर जमिनीचा विकास उदा. कंटूर व ग्रेडेड बंडस्, झाडांची तटबंदी, टेकडी परिसरात बेंच टेरेसिंग, चारा व इमारतीचे लाकूड, इंधन लाकूड, फलोत्पादन करणा-या उत्पादीत जात्ाी यांच्या नर्सरिला प्रोत्साहन देणे.
  • पूर्वी केलेल्या सार्वजनिक मालमत्तेतून सातत्सपूर्ण फायदा मिळविण्यासाठी अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक मालमत्ता व पाणलोट क्षेञातील रचना व यांची दुरुस्ती, देखभाल करणे.
  • नविन पिके किंवा त्यांच्या वेगवेगळया जाती तसेच नविन व्यवस्थापन तंञाची प्रसिध्दी होण्यासाठी पिकांचे प्रात्यक्षिक करणे.

प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण यंञणा

गट विकास अधिकारी,
पंचायत समिती, धुळे, साक्री, शिंदखेडा.

गाव पातळीवरील पाणलोट विकास समिती

ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रअप्रक्षेका 1003/प्रक्र 120/ जल -20, मंत्रालय, मुंबई दि. 01 नोव्हेंबर 2003 अन्वये गांवपातळीवरील पाणलोट विकास समिती /पाणलोट विकास संघ चे अध्यक्ष सरपंच हे आहेत. तसेच सचिव ग्रामसेवक हे आहेत.

पाणलोट विकास संघ

जेव्हा पाणलोट क्षेत्र आणि गावाचे क्षेत्र एकच असेल किंवा पाणलोट क्षेत्र गावाच्या क्षेत्राच्या भाग असेल तेव्हा ग्राम पंचायतीची ग्रामसभा ही पाणलोट संघ (वॉटरशेड असोसिएशन) म्हणून ओळखली जाते.

निधीचा तपशिल

सध्याचे खर्चाचे निकष रु. 6000/- प्रति हेक्टर असे आहे. एका पाणलोटातील 500 हेक्टर क्षेञाकरीता रु. 30.00 लक्ष त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.

1
पाणलोट क्षेञातील उपचार कामासाठी 85 टक्के.
2
प्रशासकिय खर्च 10 टक्के
3
सामूहिक संघटन व प्रशिक्षण 5 टक्के
एकूण 100 टक्के

प्रशिक्षण

ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र. अप्रक्षेका 2005/प्रक्र/ 158 /जल -20, मंत्रालय, मुंबई दि. 29 सप्टेंबर 2007 अन्वये वॉटर, अहमदनगर या सहाय्यकारी प्रशिक्षण संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

निवडलेली गांवे

हरीयाली योजने अंतर्गत निवडण्यात आलेले पाणलोट माहिती खालीलप्रमाणे आहेत.

अ.क्र.
पाणलोटाचे नांव
बॅच क्र. 1
1
रानमळा ता. धुळे

2

रावेर ता. धुळे
3
नाडसे ता. साक्री
4
छावडी ता. साक्री
5
चुडाणे ता. शिंदखेडा
6
बाभूळदे ता. शिंदखेडा
बॅच क्र. 2
1
कुंडाणे-वार ता. धुळे
2
मोरदड तांडा ता. धुळे
3
डोमकाणी ता. साक्री
4
वार्सा ता. साक्री
5
वारुड ता. शिंदखेडा
6
रहिमपुरे ता. शिंदखेडा
बॅच क्र. 3
1
सैताळे ता. धुळे
2
वडजाई ता. धुळे
3
आर्णी ता. धुळे
4
पवारपाडा ता.साक्री
5
कुत्तरखांब ता. साक्री
6
चिलाणे ता. शिंदखेडा
7
डांगुर्णे ता. शिंदखेडा
बॅच क्र. 4
1
सरवड ता. धुळे
2
वरखेडी ता. धुळे
3
लामकनी ता. धुळे
4
कुडाशी ता. साक्री
5
उमरपाटा ता. साक्री
6
गरताड ता. साक्री
7
अंजनविहीरे ता. शिंदखेडा
8
साहूर ता. शिंदखेडा
9
कुरूकवाडे ता. शिंदखेडा