मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  

इंदिरा आवास योजना

  
दारिद्रय रेषा कुटूंब गणना 2002-2007 च्या यादीनुसार इंदिरा आवास योजनेच्याघरकुलासाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती / जमाती आणि इतर लाभार्थीच्या दोन स्वतंत्र प्रतिक्षा याद्या दारिद्रय रेषेच्या यादीतील गुणंाकाच्या प्राधान्य क्रमानुसार ग्रामसभेच्या मान्यतेने तयार करण्यात आलेल्या असुन त्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भिंतीवर रंगविण्यात आलेल्या आहेत.

जिल्हयाच्या बेघर लाभार्थींच्या प्रतिक्षा यादीची संख्या पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र.
तालुका
अ.जा.
अ.ज.
इतर
एकुण

1

धुळे
1805

5763

7042
14610
2
साक्री
1216
12790
3040
17046
3
शिरपुर
1747
16465
5516
23728
4
शिंदखेडा
1387
3780
5324
10491
5
एकुण
6155
38798
20922
65875

उद्देश

अनुसूचित जाती / जमातीचे सदस्य, मुक्त वेठबिगार तसेच ग्रामीण भागातील इतर दारिद्रय रेषे खालील बेघर व्यक्तींना घरकुलाच्या बांधकामासाठी आर्थिक मदत करणे हा इंदिरा आवास योजनेचा मुळ उद्देश आहे.

लाभार्थी निवड

  • दारिद्रय रेषा कुटूंबगणना-2002-07 च्या आधारे चढत्या गुणंाकाने अनुसूचित जाती / जमाती आणि इतर लाभार्थीच्या दोन स्वतंत्र प्रतिक्षा याद्याग्राम सभेच्या मान्यतेने तयार करण्यात आलेल्या आहे. गावनिहाय उद्दीष्टानुसार प्रतिक्षा यादीतील गुणंाकाचा प्राधान्य क्रमानुसार लाभार्थी निवड करण्यात येते.
  • जिल्हयाच्या उद्दीष्ठाच्या किमान 60 टक्के अनुसूचित जाती / जमाती, 15 टक्के अल्पसंख्यांक व 3 टक्के अपंग लाभार्थींना लाभ दिला जातो.

अम्मलबजावणी

  • घरकुलाचे बांधकाम हे लाभार्थीने स्वत: कुशल कारागीरा मार्फत करावयाचे आहे.
  • घरकुलाचे बांधकाम ठेकेदारामार्फ करण्यात येवू नये.
  • घरकुलाचे बांधकामाचे क्षेत्रफळ किमान 20 चौ.मी. असणे आवश्यक आहे.
  • घरकुलामध्ये शौचालय बांधणे व निर्धुर चुली बसवणे आवश्यक आहे. मात्र शौचालयासाठी अनुदान संपुर्ण स्वच्छता अभियानातुन देय राहील.
  • घरकुल पुर्ण झाल्यानंतर घरकुलाची नोंद ग्रा. प. नमुना नं. 8 ला पती आणि पत्नी यांचे संयुक्त नावे करणे बंधनकारक आहे.
  • घरकुल पुर्ण झाल्या नंतर घरकुलाची देखभाल व दुरुस्ती लाभार्थीने स्वत: करावयाची आहे.

अनुदान

शासन निर्णय क्र./ इंआयो /2008 प्र.क्र-120/08 यो-10 दि. 26/9/2008 अन्वये इंदिरा आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणा-या व दि. 1/4/2008 पासून मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांची किंमत पुढील प्रमाणे.

घरकुलाची एकुण किंमत रु 45,000/-

भारत सरकार अनुदान
75 टक्के
रु.26250/-
महाराष्ट्र शासन
25 टक्के
रु.8750/-
महाराष्ट्र शासन अतिरिक्त अनुदान
--
रु.8500/-
लाभार्थी हिस्सा (मजुरीच्या स्वरुपात)
--
रु.1500/-
एकुण
--
रु.45000/-

शासनाचे पत्र क्र./इंआयो-2008/ प्र.क्र. 175/ योजना-10 दिनांक 11-08-08 अन्वये इंदिरा आवास योजने अंतर्गत लाभार्थींची निवड होताच सदर लाभार्थींच्या नावे बँकेत अथवा पोस्टात खाते उघडण्यात येवून घकुलाच्य्ाा बांधकामाच्या प्रगतीनुसार लाभार्थीला देण्यात येणारे अनुदान हे लाभार्थीच्या बँक किंवा पोस्ट खात्यात सरळ जमा करण्यात येते.

त्या अनुषंगाने सन 2008-09 मधील खालील प्रमाणे मंजुरी देण्यात आलेली आहे.

अ. क्र.
तालुका
अ. जा.
अ.ज.
इतर
अल्पसंख्यांक
अपंग
एकुण
1
धुळे
10
294
270
142
30
746
2
साक्री
23
512
114
58
15
722
3
शिरपुर
27
668
211
151
27
1084
4
शिंदखेडा
13
182
200
111
4
510
5
एकुण
73
1656
795
462
76
3062

या प्रमाणे मंजुरी देण्यात आलेली आहे.