समन्वय
ग्रामस्थ
दिन या कार्यक्रमाचे यशापयश हे प्रभावी व सनियंत्रणावर अवलंबून
असेल. समन्वय व सनियंत्रणासाठी खालीलप्रमाणे व्यवस्था राहील.
- विभागीय
स्तरावर विभागीय लोकशाही दिन सभेत, महसूल अधिकारी व मुख्य
कार्यकारी अधिकारी यांचे सभेत प्रत्येक महिन्यात या ग्रामस्थ
दिन कार्यक्रम
अंमलबजावणीचा आढावा घेणेत येईल.
- विविध शासकीय विभागाचे विभागीय व जिल्हा स्तरावर नियुक्त
करण्यात येणारे
फिरते तपासणी पथकही याबाबत भेटीचे वेळी या कार्यक्रमाचे
अंमलबजावणीची
तपासणी करेल.
- सर्व शासकीय विभागांचे क्षेत्रिय अधिकारी यांनी त्यांचे
ग्राम भेटीचे या कार्यक्रमाचे
अंमलबजावणीची चौकशी करावी. ग्रामस्थदिनात उपस्थित होणारे
आपले विभागाचे
प्रश्न सोडवावेत वा यथास्थिती विभागीय आयुक्त किंवा
संबंधित जिल्हाधिकारी / मुख्य
कार्यकारी अधिकारी यांना समक्ष भेटीचे वेळी न चुकता
आपले अभिप्राय कळवावेत.
- जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील जिल्हा लोकशाही
दिनाचे सभेत, तहसिलदार
यांनी तालुका लोकशाही दिनाचे सभेत तसेच शासकीय विभागांनी
त्यांचा मासिक
आढावा सभेत हा विषय देऊन त्याचा तपशिलवार आढावा घ्यावा
व ग्रामस्थ दिनात
उपस्थित होणारे प्रश्न सोडवावेत / आवश्यक त्या सुधारणा
उपाय योजना कराव्यात.
- जे कर्मचारी अनुपस्थित राहतील त्यांना तात्काळ
कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी
व सलग अनुपस्थिती आढळल्यास निलंबनाची कार्यवाही
करण्यांत यावी.
सनियंत्रण
या कार्यक्रमाचे
सनियंत्रण त्रिस्तरिय पध्दतीचे राहिल. विभागीय स्तरावर विभागीय
आयुक्त, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व क्षेत्रिय स्तरावर
उपविभागीय अधिकारी हे ग्रामस्थ
दिन कार्यक्रमाचे समन्वयक व सनियंत्रण अधिकारी म्हणून काम
पाहतील.
- प्रत्येक
ग्रामस्थ दिनाचे दुसरे दिवशी सर्व ग्राम अधिकारी त्यांचे
तालुका कार्यालयास
त्यांचे विभागाशी संबंधित विषयावर उपस्थित मुद्याचा तपशिल
अहवाल रूपाने सादर
करतील.
- ग्राम पालक अधिकारी प्रत्येक दिनाचे दुसरे दिवशी विहीत
केलेल्या प्रपत्रात
तहसिलदार यांचेकडे अहवाल सादर करील.
- क्षहसिलदार यांचे कार्यालयात यासाठी एक कक्ष सुरू
करावा. निवासी नायब
तहसिलदार हे या कक्षाचे काम पाहतील. पालक अधिकारी
यांचे अहवाल संकलित
करून संबंधित अधिकारी यांना लिहिणे, समन्वय विषयक
बाबी तहसिलदार यांचे
मार्फत कणे, प्रत्येक ग्रामस्थ दिनानंतर लगेच मंडल
निहाय संकलित अहवाल
जिल्हाधिकारी यांना सादर करणे व या उपक्रमाचे सनियंत्रणाचे
पूर्ण काम या
कक्षाकडून पाहिले जाईल.
- उपविभागीय अधिकारी हे त्यांचे अधिनस्त तालुक्यांच्या
बाबतीत समन्वयन व
सनियंत्रणाच पूर्ण काम पाहतील.
- जिल्हा स्तरावर उपजिल्हाधिकारी (महसूल) हे
पूर्ण कार्यक्रम अंमलबजावणीचे काम
पाहतील व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील बाबींची
पूर्ण जिल्ह्याची माहिती संकलित
करणे ती जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षाकडे
पाठविणे इ. बाबतीत जिल्हा परिषद
स्तरावर अतरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या
कार्यक्रमाचे समन्वय व सनियंत्रण
काम पाहतील.
- हे सर्वच शासकीय कामकाजाची परिणामकारकता
वाढविणे काम असल्याने हे काम
अधिक संघभावनेने करणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार
या कार्यक्रमाची उपयुक्तता
वाढावी यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी
अधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी,
उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेतील
खाते प्रमुख व जिल्हास्तरीय इतर
शासकीय विभागांचे अधिकारी यांची संयुक्तपणे
तालुका निहाय पथके तयार करावीत.
या पथकाने संयुक्तपणे दौरे करावेत, काही
ग्रामस्थ दिन कार्यक्रमास हजर रहावे
तसेच आपल्या विभागाचे प्रश्न जागेवरच कसे
सुटतील हे पहावे. फिरती पूर्ण
झालेनंतर आपले अहवाल जिल्हा कक्षास सादर
करावेत.
- उपायुक्त विकास हे जिल्हा परिषद अंतर्गत
येणा-या विषयांच्या बाबतीत ग्रामस्थ दिनात
येणा-या बाबींची समस्यांची सोडवणूक संबंधितांकडून
घेतील व त्यासंदर्भातील सर्व
जिल्हा परिषदांमधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी बाबींचा विभागाचा संकलित
अहवाल ग्रामस्थ दिन विभागीय नियंत्रण कक्षाकडे
देतील.
- विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त
(महसूल प्रशासन) यांचे
नियंत्रणाखाली ग्रामस्थ दिन समन्वय व
सनियंत्रणासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन
करणेत येईल. या कक्षामार्फत नाशिक विभागातील
या कार्यक्रमाचा विभागीय
लोकशाही दिन सभेत आढावा घेणे, मूल्यमापन
करणे, तसेच आवश्यक त्या सुधारणा
सुचवणे विषयक कामे केली जातील.
- विभागीय आयुक्त कार्यालयातून खालील
प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी उप
आयुक्त
दर्जाचे अधिकारी प्रशिक्षण व ग्रामस्थ
दिन उपक्रमाच्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षणासाठी
संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करण्यांत
येत आहे.
अ.
क्र.
|
जिल्ह्याचे नांव
|
संपर्क अधिकायाचे पदनाम
|
|
1
|
अहमदनगर |
उप आयुक्त (महसूल) |
2
|
नाशिक |
उप आयुक्त (करमणूक कर) |
3
|
धुळे |
उप आयुक्त (सामान्य प्रशासन) |
4
|
नंदुरबार |
उप आयुक्त (पुरवठा) |
5
|
जळगांव |
उप आयुक्त (पुनर्वसन) |
|
|
|