मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  
ग्रामस्थ दिन योजना - प्रयोजन
     

ग्राम पातळीवरील प्रशासन हे आजच्या परिस्थितीत सर्वात महत्वाचे झाले आहे. शासनामार्फत ग्रामस्थांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात परंतु ब-याच योजनांचा लाभ प्रत्यक्ष ग्रामस्थांपर्यंत ब-याचवेळा पोहोचत नाही असे चित्र दिसते. गाव पातळीवर महसूल विभागाचा प्रतिनिधी तलाठी, ग्राम विकास विभागाचा प्रतिनिधी ग्रामसेवक तसेच शासनाच्या विविध खात्याचे ग्रामस्तरीय अधिकारी / कर्मचारी कार्यरत असतात.त्यांना ग्रामीण जीवनाची तसेच त्यासंबंधीच्या प्रश्नांची / समस्यांची / चांगली जाण असते. वर नमुद केल्याप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्या त्या शासकीय प्रतिनिधीमार्फत सामान्यतल्या सामान्य घटकापर्यंत प्रभावीरित्या पोहचविण्यात येणा-या अडचणी / समस्यांची सोडवणूक तिथल्या तिथे होवू शकते व तसेच ते होणे आवश्यकही आहे. परंतु तसे होतांना दिसत नाही. तसे न होण्याच्या अनेकविध कारणांपैकी वर नमुद केलेल्या विविध ग्रामपातळीवरील शासकीय / अधिकारी कर्मचा-यांमधील समन्वयाचा अभाव हे एक प्रमुख कारण दिसून येते.त्यामुळे त्यांचा परस्पर समन्वय घडून आणणे हे ग्रामस्तरावरील समस्या / अडचणी सोडविण्याचे दृष्टीकोनातून उचललेले महत्वाचे पाऊल ठरेल.

ग्रामस्थांना येणा-या अडचणी

गावपातळीवरील ग्रामस्थांच्या प्रश्नात गावक-यांना 7/12 उतारा लवकर न मिळणे / जमीन विषयक नोंदी लवकर न होणे, ग्रामपातळीवरील अभिलेख जसे जन्म-मुत्यु दाखला, विविध अर्ज ग्रामस्थांना सहज उपलब्ध न होणे, गावातील स्वस्तधान्य दुकानात केरोसिन व धान्य न मिळणे किंवा ते शासकीय किंमतीत न मिळणे, शाळेत शिक्षकांची अनुपस्थिती, शालेय पोषण आहार / अंगणवाडी आहार न मिळणे, प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्रांवर आरोग्य अधिकारी / कर्मचारी हजर नसणे / औषधे उपलब्ध नसणे, वीज चोरी होणे, कृषी विषयक माहिती ग्रामस्थांना न मिळणे, पिक पहाणी योग्य पध्दतीने न होणे, ग्रामस्तरावरील विविध योजनांची माहिती न मिळणे हे व अशा सारखे अनेक प्रश्न लाभार्थींना, ग्रामस्थांना भेडसावत असतात. त्यामुळे गांव स्तरावरील विविध कल्याणकारी योजनांचा लाभ व त्याबाबतची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचते किंवा कसे हे गाव पातळीवरीच पाहून त्याचा नियमितपणे आढावा घेणे अत्यावश्यक आहे.

ग्रामस्थ दिन कशासाठी ?

लोकांपर्यंत जाण्यामध्ये शासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडते व यातून जनतेची कामे रखडली जातात अशी लोकांची सर्वसाधारणपणे प्रतिक्रिया जाणवते. प्रतिसादात्मक प्रशासन ही सध्याच्या काळाची गरज आहे. कारण समाज हा नेहमीच परिवर्तनशील असतो. बदलत्या परिस्थितीची आव्हाने पेलण्यासाठी प्रशासनालाही गतीमान व परिवर्तनशील बनणे क्रमप्राप्त आहे. म्हणून सर्व ग्राम अधिका-यांनी ठराविक दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीत जावून थेट ग्रामस्थांशी चर्चा करून प्रश्न समजावून घेणे व जे प्रश्न सुटण्यासारखे आहेत ते सोडविण्याची प्रक्रिया सुरू करणेसाठी ग्रामस्थ दिन हा अभिनव उपक्रम आयोजित करणेचे
निश्चित करणे आले आहे.