मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  
ग्रामस्थ दिन योजना - प्रशिक्षण
     

ग्रामस्थ दिन कार्यक्रमाची व्याप्ती

नाशिक विभागातील खालीलप्रमाणे एकूण 4886 ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक दोन महिन्यापासून एकदा ग्रामस्थ दिन सभा आयोजित करणे व झालेल्या कामकाजाचा व प्राप्त तक्रारींचा पाठपुरावा करत राहणे हे व्यापक स्वरूपाचे व अत्यंत महत्वाचे काम आहे. विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना हे काम करावे लागणार आहे. सर्वच विभागाकडून दिल्या जाणा-या सेवा व राबविल्या जाणा-या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये या कार्यक्रमामुळे मदत होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे म्हणून सर्वच स्तरातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

महसूल विभागाचा प्रशासकीय रचनात्मक तक्ता

नाशिक महसूल विभाग

अ. क्र.
जिल्हा
उपविभाग
तहसिल
महसूल मंडळे
सजांची संख्या
गावांची संख्या
ग्रामपंचायती

1

नाशिक
4
15
70
532
1957
1373
2
धुळे
2
4
32
225
676
551
3
नंदुरबार
2
6
32
222
862
501
4
जळगांव
4
15
75
505
1500
1152
5
अहमदनगर
4
14
51
564
1588
1309
विभागाची एकूण
16
54
260
2048
6583
4886

ग्रामस्थ दिन प्रशिक्षण

ग्रामस्थ दिन योजनेची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी सर्व संबंधितांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कार्यक्रम खालीलप्रमाणे राबविण्यात यावा.

प्रत्येक प्रशिक्षण वर्गासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी न चुकता हजर रहावे. क्षसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील संबंधित संपर्क उप आयुक्त यांनी सुध्दा प्रशिक्षणासाठी न चुकता हजर राहून सर्व संबंधितांना ग्रामस्थ दिन ही संकल्पना कळेल अशा पध्दतीने प्रशिक्षण दिले जाईल याबाबत दक्षता घ्यावी.