जिल्हाधिकारी
यांची जबाबदारी
- संपूर्ण
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक दोन महिन्यातून
ग्रामस्थ दिन सभा
आयोजित करणे.
- स्वत: जास्तीत जास्त ग्रामस्थ दिनांना उपस्थित राहणे.
- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ग्रामस्थ दिनाचा आढावा घेणे.
- जिल्हास्तरीय अधिका-यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे.
- मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे साहाय्याने सर्व पालक
अधिका-यांना सर्व शासकीय
योजनांच्या पुस्तिका, ग्रामस्थ दिन सूचना पुस्तिाका,
योजनांचे फॉर्म्स, इतिवृत्त नोंदवही,
स्टेशनरी, फलक / बॅनर्स उपलब्ध करून देणे.
- सर्व उपविभागीय अधिका-यांमार्फत सर्व तालुक्यांमध्ये
ग्राम अधिकारी, पालक अधिकारी व
सरंपच, लोकप्रतिनिधी यांचे प्रशिक्षण वर्ग घेणे.
- ग्रामस्थ दिनाचे सनियंत्रण व समन्वयाचे काम
पाहणे.
- ग्रामस्थ दिन विषयक अहवाल पाठविणे.
मुख्य
कार्यकारी अधिकारी यांची जबाबदारी
- जिल्हा
परिषदेमार्फत राबविण्यात येणा-या केंद्र पुरस्कत योजना, राज्य
शासनाच्या
योजना,
जागतिक बँक व इतर परदेशी वित्तीय सहाय्यातून राबविण्यात येणा-या
योजना तसेच
जिल्हा परिषदेच्या स्थानिय निधीतून राबविण्यात येणा-या
योजना अशा सर्व योजनांची
माहिती असणारी पुस्तिका तात्काळ संकलित करून सर्व जिल्हास्तरीय
अधिकारी, सर्व
तालुकास्तरीय अधिकारी, सर्व ग्राम पालक अधिकारी व सर्व
ग्रामपंचायती यांना ग्रामस्थ
दिनाचे अंमलबजावणी करणारे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत
पुरविण्यांत याव्यात.
- स्वत: जास्तीत जासत ग्रामस्थ दिनांना उपस्थित रहावे.
- ग्रामस्तरावर ग्रामस्थ दिनाचे माध्यमातून शासकीय सेवा,
विकास, योजना, कल्याणकारी
योजना व विविध कार्यक्रम अभियान यांची जागृती, प्रसिध्दी
व अंमलबजावणी या कामांना
गती देण्याचे काम करण्यात येणार आहे.त्यामुळे दिन विषयक
उपविभागीय अधिकारी,
तहसिलदार व ग्रामपालक यांना आवश्यक असणारी अनुषंगिक मदत
उदा. प्रशिक्षण
आयोजित करणारे, संपर्क व्यवस्था, प्रसिध्दी इत्यादिसाठी
व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
- ग्रामस्थ दिनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे
बाबींची आवश्यकता लागेल ती
पुरविण्याची व्यवस्था करण्यात यावी.
- सर्व योजनांची माहिती
असणारी पुस्तिका.
- ग्रामस्थ दिन सूचना पुस्तिका
- सर्व योजनांचे छापील कोरे नमुने.
- ग्रामपालकांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला एक याप्रमाणे
इतिवृत्त नोंदवही.
- ग्रामपालकांना पुरविण्यासाठी ग्रामस्थ
दिन पुस्तिकेतील प्रपत्रांचे कोरे
नमुने.
- ग्रामपालकांना पुरविण्यासाठी
कोरे कागद, कार्बन, फाईल कव्हर,
टॅग, टाचण्या
इ.
स्टेशनरी.
- प्रसिध्दीसाठी फलक / बॅनर्स
इ.
- सर्व खातेप्रमुखांना ग्रामस्थ दिन कार्यक्रमात
भाग घेऊन सतत आढावा घेण्याविषयी तसेच
त्याचे प्रत्येक भेटीचे वेळी, ठिकाणी ग्रामस्थ दिनात
प्राप्त झालेल्या अडचणी व तक्रारी
सोडविणेच्या सूचना देणे.
- खातेप्रमुखांच्या बैठकीत ग्रामस्थ दिन योजना अंमलबजावणीचा
आढावा घेणे व या
योजनच्या अंमलबजावणीत उदासिनता दाखविणारे / टाळाटाळ
करणारे अधिकारी /
कर्मचारी यांचेविरूध्द शिस्तभंगाची कार्यवाही करणे.
विभागीय
खाते प्रमुखांची जबाबदारी
- विभागीय
लोकशाही दिन कार्यक्रमात सर्वानमते ठरविल्यानुसार सर्व खातेप्रमुखानी
त्यांचे
अधिनस्त सर्व जिल्हा, तालुका, क्षेत्रिय व ग्रामस्तरीय
अधिकारी व कर्मचारी यांना ग्रामस्थ
दिन उपक्रम अंमलबजावणीमध्ये सक्रीय सहभागी होण्याच्या
सूचना द्याव्यात.
- उपविभागीय अधिकारी अथवा तहसिलदार यांनी ग्राम पालक
अधिकारी / ग्रामस्थ
यांचेकडून प्राप्त झालेल्या विभागाविषयक तक्रारींची
दखल घेवून त्या तातडीने
सोडविणेसाठी उपाययोजना करावी.
- उपविभागीय अधिकारी अथवा तहसिलदार यांनी ग्राम
पालक अधिकारी / ग्रामस्थ
यांचेकडून प्राप्त माहितीच्या आधारावर एखादे
तालुकास्तरीय/क्षेत्रिय/ ग्राम स्तरीय
अधिकारी/कर्मचारी ग्रामस्थ दिन विषयक कामकाजात
भाग घेत नाहीत अशी तक्रार
केल्यास संबंधितांचे विरूध्द नियमानुसार विभागीय
कारवाई तात्काळ सुरू करावी.
- विभागामध्ये दौरे करतांना प्रत्येक वेळी भेटीचे
ठिकाणी आपल्या विभागाविषयक ग्रामस्थ
दिनात उपस्थित होणारे प्रश्न, त्यावरील उपाययोजना
व चालणारे कामकाज या विषयी
आढावा घ्यावा.
- आपल्या विभागानी संबंधित शासकीय योजना /
सेवा अधिक प्रभावीपणे व
परिणामकारकपणे ग्रामस्तरावर पुरविणेसाठी
या ग्रामस्थ दिन योजनेचा पुरेपूर उपयोग
करून घ्यावा व वेळोवेळी आवश्यक वाटतील त्या
बदलासाठीच्या सूचना अहवाल पाठवून
तसेच विभागीय लोकशाही दिनाचे बैठकीचे वेळी
कळवाव्यात.
जिल्हास्तरीय
व तालुकास्तरीय अधिकारी यांच्या जबाबदा-या
- जिल्हा
व तालुक्याचे ठिकाणी ग्रामस्थ दिन समन्वयन व सनियंत्रणासाठी
घेण्यात येणा-या
बैठकांना हजर राहणे.
- सर्व अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांना ग्रामस्थ
दिन विषयक सोपविलेले सर्व कामे
व्यवस्थितपणे करणेविषयी सूचना देणे.
- जिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी/तहसिलदार
यांच्या सूचनांनुसार आवश्यक ते
पर्यवेक्षकीय काम करणे, ग्रामस्थ दिनात आपल्या
विभागा विषयक प्राप्त होणा-या
तक्रारी/अडचणी सोडविणेसाठी तात्काळ उपाययोजना
करणे व तसे कळविणे.
- जिल्ह्यात/तालुक्यात दौरे करतांना प्रत्येक
भेटीचे वेळोवेळी भेटीचे ठिकाणी आपल्या
विभागाविषयक ग्रामस्थ दिनात उपस्थित
होणारे प्रश्न, त्यावरील उपाययोजना व
चालणारे
कामकाज या विषयी आढावा घ्यावा.
- शासकीय योजनांतर्गत वैयक्तिक लाभ
वितरणाचे कार्यक्रम दिनाचे दिवशीच
ठेवावेत.
म्हणजे जास्तीत जास्त ग्रामस्थ ंत्या
दिवशी हजर राहून ग्रामस्थ दिनात सहभागी
होवू
शकतील.
- आपल्या विभागाशी संबंधित शासकीय
योजना / सेवा अधिक प्रभावीपणे व
परिणामकारकपणे ग्रामस्तरावर बदलासाठीच्या
सूचना व कल्पना अहवाल पुरेपूर उपयोग
करून घ्यावा व वेळोवेळी आवश्यक वाटतील
त्या बदलासाठीच्या सूचना व कल्पना
अहवाल पाठवून तसेच जिल्हास्तरीय
लोकशाही दिनाचे/ तालुकास्तरीय ग्रामस्थ
दिन
बैठकीचे वेळी कळवाव्यात.
प्रकल्प
अधिकारी, आदिवासी उप योजना
- आदिवासी
विभागातील ग्रामपंचायतीमध्ये ज्या दिवशी दिन असेल त्या दिवशी
आदिवासी
विकासाच्या सर्व योजनांची माहिती देण्याची व्यवस्था
करावी. प्रपत्र 3 मधील नमुन्यात
नोंदवहीत तक्रारी नोंदवाव्यात.
- आदिवासी उपयोजनांतर्गत जे वैयक्तिक लाभ
वाटपाचे काम असेल ते ग्रामस्थ दिनातच
करावे. लाभ वाटप केलेल्या लाभार्थींचे
नांवे ग्रामस्थ दिन सभेत खुलेपणाने वाचून
दाखवावीत.
- ग्रामस्थ दिनासाठी प्रकल्प अधिकारी
कार्यालयाने प्रतिनिधींना हजर राहण्याच्या
सूचना
द्याव्यात.
- आदिवासी क्षेत्रातील ग्रामस्थांच्या
अडचणी/तक्रारी तात्काळ सोडवाव्यात
व सतत संबंधित
उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार यांचे
संपर्कात राहून माहिती घ्यावी व आवश्यक
त्या
उपाय योजना कराव्यात.
|