मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  
ग्रामस्थ दिन योजना - प्रसिद्धी
     

ग्रामस्थ दिन योजनेचा मूळ हेतू हा ग्रामस्तरावर जावून शासकीय सेवा, कल्याणकारी योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, ग्रामविकासाचे प्रकल्प, इ. ची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे, असे लाभ व शासकीय सेवा प्राप्त करण्यामधील ग्रामस्थांच्या अडचणी समजावून घेणे व सोडविणे. ग्रामपातळीवरील चालू असणा-या प्रकल्पांची, कामांची तपासणी करून त्याची परिणामकारकता वाढविणे हा आहे. त्यामुळे ग्रामस्थ दिनाच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांना / ग्रामस्थांना सहभागी होता यावे, त्यांचे म्हणजे अडचणी/तक्रारी/सूचना मांडता याव्यात व ग्रामस्थ दिन उपक्रमाचे माध्यमातून ग्रामीण भागातील समस्या सोडविण्याच्या कामाला गती मिळावी यासाठी या कार्यक्रमाला व्यापक प्रमाणात प्रसिध्द देणे आवश्यक आहे.

या उपक्रमाचे प्रसिध्दीसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी/तहसिलदार यांनी खालील प्रमाणे उपाययोजना कराव्यात.

  • प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या तारखेला ग्रामस्थ दिन होणार याचे वेळापत्रक तहसिल कार्यलय, पंचायत समिती, सर्व ग्रामपंचायती, सहकारी संस्था यांचे सूचना फलकावर व स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिध्द करावे.
  • तलाठी/ग्रामसेवक यांचेमार्फत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थ,सरपंच, पंचायत सदस्य व इतर लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी इ.ना ग्रामस्थ दिन सभेची तारीख व वेळ कळवावी.
  • गावी दवंडी देऊन सर्व ग्रामस्थांना सूचित करावे.
  • क्षेत्रिय/ग्राम अधिका-यामार्फत या उपक्रमाला प्रसिध्दी द्यावी.
  • बाजाराचे दिवशी हँडबिल वाटून या योजनेला प्रसिध्दी द्यावी.
  • सभेच्या ठिकाणी आकर्षक फलक/बॅनर्स लावावेत.
  • आकाशवाणीच्या सहकार्याने ग्रामस्थ दिनास प्रसिध्दी देणे.
  • ग्रामस्थ दिन सभेसाठी पत्रकारांनाही आमंत्रित करावे.

ग्रामस्थ दिनाची व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करणे आवश्यक आहे. प्रत्येक गावापर्यंत ग्रामस्थ दिनाची तपशिलवार माहिती दिली जाईल यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा माहिती अधिका-यांच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व माध्यमाव्दारे प्रसिध्दी करावी.