| प्रस्तावना
धुळे जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभाग हा विकास कामांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा
विभाग आहे.या विभागाच्या अंतर्गत केंद्र शासन राज्य शासन व जिल्हा परिषदे मार्फत
देणेत येणा-या अनुदानातुन नविन रस्ते
तयार करणे , रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे ,इमारती अंतर्गत शाळा बांधणे , शासकिय
इमारती व निवासस्थाने इमारती बांधकामे , तालीम इमारती , समाजमंदिर , सार्वजनिक वाचनालय,
बहुद्येशिय सभागृह , प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती व निवासस्थाने इत्यादी बांधकामांचा
समावेश आहे.
बांधकाम विभाग अंतर्गत एकुण 05 उपविभाग अस्तीत्वात असुन या यंत्रणा मार्फत विविध
विकास कामे करुन घेतली जातात . बांधकाम विभागांतर्गत एकुण 3466.30 कि.मी.लांबीचे
रस्ते अस्तीत्वात असुन त्यापैकी डांबरी 1425.80 कि.मी. ,1455.56 किमी खडीचे , मुरमी
447.14 किमी व अपृष्टांकित 138.10 किमी रस्ते आहेत.
बांधकाम विभाग मार्फत खालील विविध योजने अंतर्गत कामे राबविण्यात येतात.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
ग्रामीण रस्ते बांधणी हा ग्रामीण विकासातील
घटक आहे. ज्यायोगे देशातील आर्थिक व सामाजिक विकासाला चालना
मिळु
शकते . अदयापी
देशातील 40 टक्के वस्त्या या बारमाही
रस्त्यापासुन वंचित आहेत. वरील बाबी विचारांत घेऊन ग्रामीण विकास मंत्रालय
भारत सरकार यांनी 25 डिसेंबर 2000 पासुन ग्रामीण रस्ते
बांधणीची प्रधानमंत्री ग्रामसडक
योजना जाहीर केली आहे. सदर योजनेसाठी केंद्र शासनामार्फत 100 टक्के अनुदान
मिळते. सदरची योजना संपर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषदे मार्फत
राबवली जाते.
योजनेचा उद्येश
- योजनेचा मुलभुत उद्येश म्हणजे
ज्या खेडयांना अजिबात रस्त नाही अशी खेडी एकाच बारमाही रस्यांना
जोडणे हा आहे.
- सन 2002-03 पर्यंत 1000 लोसंख्येतील सर्व खेडी बारमाही
रस्त्यंना जोडणे.
- सन 2007 पर्यंत 500 लोसंखेवरील सर्व खेडी बारमाही
रस्त्यंना जोडणे.
योजनेचा निकष
- 500 पेक्षा जास्त लोकसंख्या
असलेल्या खेडयांना व वस्त्यांना अजिबात रस्ता नाही अशी खेडी
व वस्त्या
बारमाही रस्त्याने
जोडणे एक बारमाही रस्ता असल्यास
या योजनेत
गांवासहवस्तीत जोडणारा दुसरा रस्ता घेत येत नाही.
- 500 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या खेडयांना व वस्त्यांना
अजिबात रस्ता नाही अशी खेडी व वस्त्या बारमाही रस्त्याने
जोडणे एक बारमाही
रस्ता असल्यास
या योजनेत
गांवासहवस्तीत जोडणारा दुसरा रस्ता घेत येत नाही.
- 500 पेक्षा जास्त लोकसंखे वरील अजिबात रस्ता नसलेली वस्तया
बारमाही रस्त्यापासुन किंवा बारमाही गावांपासुन 500 मीटरच्या
पलिकडे असणे
आवश्यक आहे.
- खेडया व वस्त्या उपविभागाने केलेल्या कोअर नेटवर्क मध्ये
समाविष्ठ असणे आवश्यक आहे
- सदर योजनेमध्ये फक्त ग्रामीण रस्तेच म्हणजेच इतर जिल्हा
मार्ग व ग्रामीण मार्ग दर्जा चे रस्ते घेता येतात.
- सदर योजनेमध्ये रस्त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध असणे
गरजेचे आहे .या योजनेतुन भुमी संपादन करता येत नाही .
व त्यासाठी
अनुदान उपलब्ध
केले
जात नाही.
- रस्ते व दुरुस्तीची कामे या योजनेतुन घेता येत नाही.
- रस्ते दर्जा उन्नतीची कामे घेता येतात परंतु त्या जिल्हयातील
संपुर्ण गावे बारमाही रस्त्यांना जोडणेची कामे पुर्ण
झाल्यानंतरच सदरची कामे
लोकसंख्या व पी.एस.आय.
चे प्राधान्य क्रमानुसार घेण्यात येतात.
प्राधान्यक्रम
केंद्र शासनाच्या मार्ग दर्शकपुस्तकेतील
सुचना नुसार खालील प्रमाणे प्राधान्यक्रम ठरविणेत आलेला आहे.
- 1000 लोकसंख्येवरील अद्याप रस्ता नसलेली खेडे व वस्त्या
एका बारमाही रस्य्ताने जोडणे
- 500 लोकसंख्येवरील अद्याप रस्ता नसलेली खेडी व वस्त्या
एका बारमाही रस्त्याने जोडणे
- जिल्हा घटक धरुन लोकसंखेच्या प्राधान्यक्रमानुसार
कामे घेणे (लोकसंखेचा प्राधान्यक्रम म्हणजेच जिल्हातील
500
पेक्षा लोकसंख्येच्या
एकुण गावाची यादीवरुन ती उतरत्या क्रमाने म्हणजे
999 लोकसंख्या असलेले गांव प्रथम त्यानंतर तर 998
लोकसंख्येचे
गावानुसार)
- कोअर नेटवर्क मधील रुटची उन्नती करणे
- कोअर नेटवर्क मधील लिंकरुटची नविन बांधणी करणे
हा दर्जा उन्नती करणे
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हि दिनांक
25 डिसेंबर 2000 पासुन सुरु झाली असुन जिल्हा परिषदेकडे सन
2001 पासुन अंमलबजावणीसाठी सोपविण्यात आली आहे.
या योजनेतुन प्रथम प्राध्यानाने 500 लोक संख्येवरील गांवे
/वस्त्या मुख्य रस्त्यास डांबरी रस्त्याने जोडणे व हा उपक्रम
संपल्यानंतर ग्रामीण रस्त्यांची पृष्ठसुधारण
करणेची कामे हाती घेण्यात आली आहेत.
- टप्पा
क्रं. 1 -
सन 2000-01
मधील मंजुर 16 कामे सार्वजनिक बांधकाम विभाग ,धुळे यांनी
पुर्ण
केलेली
असुन त्यावर रु.300.00 लक्ष मात्र खर्च केलेला आहे.
- टप्पा क्रं.2 -
सन 2001-03 मधील मंजुर 04 कामे नविन रस्ता
बांधकामे व 11 कामे पृष्ठ सुधारणा करणे अशी एकुण 15 कामे
(रस्ते लांबी 42.63कि.मी) (अंदाजित किंमत रुपये 816.18
लक्ष ) असुन
सदरची 15 कामे पुर्ण झालेली असुन त्यावर एकुण रु.609.03
लक्ष खर्च केलेला आहे.
- टप्पा क्रं. 3 -
सन 2004-05 मधील मंजुर 03 कामे ता.धुळे
(रस्ते लांबी 14.33 कि.मी) (अंदाजित किंमत रुपये 148.49
लक्ष ) असुन
03 कामे पुर्ण झालेली असुन त्यावर एकुण रु.153.76 लक्ष
खर्च केलेला आहे.
- टप्पा क्रं. 4 -
सन 2005-06 मधील मंजुर 12 पॅकेज मधील
50रस्त्या (183.94किमी) पैकी 47 कामे पुर्ण झाली असुन
उर्वरित 3 कामे
अंतिम टप्पात आहेत.
- टप्पा क्रं. 5 -
सन 2006-07 मधील 04 पॅकेज मधील 12
रस्त्यांची (45.76 किमी) रु.2015.41 लक्ष किंमतीची
कामे अंतिम टप्पात
आहेत.
- सदर कामाची गुणवत्ता तपासणी ही राज्य गुणवत्ता
नियंत्रक (SQM)व केंद्रीय गुणवत्ता नियंत्रक(NQM)
यांचे कडुन
दर तीन महिन्यांनी
केली जाते
| मंजुर
वर्ष |
रस्त्यांची संख्या |
मंजुर लांबी कि.मी. |
निविदा रक्कम रु.लक्ष |
पुर्ण झालेली कामांची संख्या |
प्राप्त निधी |
झालेला खर्च रु.लक्ष 31/12/08 अखेर |
शेरा |
टप्पा-2
2001-03 |
15
|
42.63
|
896.18
|
15
|
740.31
|
609.03
|
15 कामे पुर्ण. |
टप्पा-3
2003-04 |
04
|
14.33
|
148.49
|
04
|
163.88
|
153.76
|
03 कामे पुर्ण. |
टप्पा-4
2004-05 |
03
|
7.43
|
69.49
|
03
|
79.92
|
77.37
|
03 कामे पुर्ण. |
टप्पा-5
2005-06 |
50
|
183.94
|
3613.00
|
50
|
3943.71
|
3537.28
|
50 कामे भौतिकदृष्टया पूर्ण |
टप्पा-6
2006-07 |
12
|
45.76
|
1919.80
|
-
|
1800.00
|
1349.86
|
12 कामे प्रगतीत. |
| एकूण |
84
|
294.09
|
6646.96
|
22
|
6727.82
|
5752.31
|
- |
|
|
PMGSY
Phase V & VI on. 31.12.2008
Dist |
Taluka |
No. of Packages |
No. of Roads |
Length of Roads Km. |
GOI. Cost Rs. In Lakhs |
Tender Cost Rs. In Lakhs (Bid Price) |
Funds Released Rs. in Lakhs. |
Physically Work done Rs. in Lakhs |
Expenditure as on 31/12/2008 Rs. in Lakhs |
Remarks |
Dhule |
Dhule |
1 |
3 |
5.46 |
110.76 |
115.45 |
115.45 |
109.174 |
109.17 |
Works Completed |
Sakri |
3 |
13 |
63.865 |
1064.57 |
1135.44 |
1072.05 |
1080.25 |
1080.27 |
Works Completed |
Shindkheda |
4 |
16 |
5432 |
1014.15 |
1040.94 |
1013.29 |
1044.82 |
1047.47 |
Works Completed |
Shirpur |
4 |
18 |
60.30 |
1322.48 |
1395.91 |
1395.91 |
1420.79 |
1325.38 |
Works In Progress |
Total |
12 |
50 |
183.945 |
3511.96 |
3687.74 |
3624.32 |
3655.03 |
3562.29 |
-- |
PMGSY
Phase VI on. 31.12.2008 |
Dhule |
Sakri |
1 |
3 |
17.29 |
715.24 |
727.58 |
1800 |
700.00 |
492.70 |
In Progress |
Shirpur |
3 |
9 |
28.47 |
1256.70 |
1287.82 |
1100.00 |
857.16 |
In Progress |
Total |
4 |
12 |
45.76 |
1971.94 |
2015.41 |
1800.00 |
1440.00 |
1349.86 |
- |
|
|
Maharashtra Rural Roads Development
Association (MRRDA)
MASTER MONITOR
PMGSY: DISTRICT STATUS AS ON 31
Dec. 2008
Physical and Financial Progress
3054 मार्ग व पुल रस्ते परिक्षण व दुरुस्ती योजनेंतर्गत रस्ते
विशेष दुरुस्ती व किरकोळ दुरुस्ती
सदर योजनेमधुन रस्ते विशेष दुरुस्ती
अंतर्गत रस्त्यांचे नविन डांबरीकरण करणे नविन खडीकरण करणे,
फेरडांबरी करण करणे ,फेरखडीकरण करणे ,मो-या बांधणे साकव दुरुस्ती
करणे इ.कामे हाती घेणेत येतात त्याचप्रमाणे किरकोळ दुरुस्ती
अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे डांबराने भरणे खडीने भरणे ,
रस्त्याच्या कडेला गटार खोदणे रस्त्याच्या कडेच्या चढलेल्या
बाजु पटटया तासणे ,पडलेल्या मो-या हेडवॉल दुरुस्ती करणे इ.
कामे हाती घेतली जातात.
योजनेचा उद्येश.
धुळे जिल्हा परिषदेकडे एकुण 4 तालुके
आहेत त्यापैकी शिरपुर ,साक्री,तालुके शासनाने डोगरी तालुके
म्हणुन घोषीत केलेले
आहेत. त्याच प्रमाणे धुळे जिल्हयातील या डोंगरी
तालुक्यामध्ये सध्या चालु असलेले साखर कारखाने 4 असुन बंद अवस्थेत आहेत.
प्राधान्यक्रम
रस्ते विशेष दुरस्ती कार्यक्रमांतर्गत
प्रत्येक तालुक्या कडुन जास्तीत जास्त् खराब झालेल्या रस्त्यंची
माहीती विभागीय
स्तरावर एकत्र केली जाते त्यापैकी अत्यंत
आवश्यक असे बसवाहतुकीचे रस्ते यांची निवडयादी शासनाकडुन उपलब्ध अनुदानाच्या
प्रमाणात तयार केली जाते.सदर निवड यादी शासनास सदर केली जाते व शासनाच्या
मंजुरी प्रमाणे
कामे घेतली जातात.
रस्ते विशेष दुरस्ती कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्या कडुन जास्तीत जास्त्
खराब झालेल्या रस्त्यंची माहीती विभागीय स्तरावर एकत्र केली जाते त्यापैकी
अत्यंत आवश्यक असे बसवाहतुकीचे रस्ते यांची नवडयादी शासनाकडुन उपलब्ध अनुदानाच्या
प्रमाणात
तयार केली जाते.सदर निवड यादी मंडळ कार्यालयाकडे मंजुरीसाठी सदर केली जाते
व त्यांच्या मंजुरी प्रमाणे कामे घेतली जातात.
धुळे जिल्हा परिषदे कडील अस्तीत्वातील
रस्ते लांबी व पृष्ठभाग खालील प्रमाणे
रस्त्याचा
दर्जा |
कि.मी. |
पृष्ठभाग डांबरी |
पृष्ठभाग खडी |
पृष्ठभाग मुरमी |
अपष्ठांकित |
इतर
जिल्हा मार्ग |
914.88 |
565.78 |
275.00 |
64.80 |
9.30 |
ग्रामीण
मार्ग |
2551.42 |
860.02 |
118.26 |
382.34 |
128.80 |
एकुण |
3466.30 |
1425.80 |
1455.26 |
447.14 |
138.10 |
|
|
शासनाकडील परिपत्रक क्रं.आरएमआर/1089/हसीआर/87 हस्ते-1 दि.15/1/95
नुसार जि.प.कडे अस्तित्वात असलेल्या रस्ते लांबीसाठी सर्वसाधारण
पृष्ठभाग निहाय खालील प्रमाणे
अनुदान मिळणे आवश्यक आहे.
| प्रमुख
जिल्हा मार्ग |
रु.29050 ते 30100 प्रती किमी |
| इतर
जिल्हा मार्ग |
रु.29050 ते 30100 प्रती किमी |
| ग्रामीण
मार्ग |
रु.29050 ते 30100 प्रती किमी |
|
|
रस्त्यांचा पृष्ठभाग
निहाय रस्ते दुरस्तीसाठी लागणारे अनुदान खालील प्रमाणे आहे.
|
लांबी |
दुरुस्ती |
रुपये लक्ष |
डांबरी |
1425.80 |
रु.29575 प्रती किमी |
481.68 लक्ष |
खडी |
1455.26 |
रु.20325 प्रती किमी |
295.78 लक्ष |
मुरमी |
585.24 |
रु.19663 प्रती किमी |
115.07 |
|
|
एकुण |
892.53 लक्ष |
|
|
आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम ( विधानसभा-विधानपरिषद )
या कार्याक्रमांतर्गत प्रत्येक मा.आमदार
यांना आपले मतदार संघातील संघाच्या विकास कामासाठी शासनाकडुन
दरसाल रक्कम रु.100.00 लक्ष इतका निधी प्राप्त होतो.सदरचा निधी
हा जिल्हाधिकारी जिल्हानियोजन समिती यांचे मार्फत वितरीत करण्ण्यात
येतो यामध्ये मतदार संघातील रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे
व्यायामशाळा बांधणे , सांस्कृतीक हॉल , समाजमंदिरे , आर.सी.सी.गटारे
,वेगवेगळ्या प्रकारचे वॉल कंपाऊड बांधणे ,निवारा शेड, स्मशानभुमी
शेड अशा स्वरुपाची कामे या अनुदानातुन करुण्यात येतात.
सदरची कामे मा.आमदार यांचेकडुन जिल्हा नियोजन मंडळाकडे सुचविणेत येतात त्यानुसार
जिल्हानियोजन मंडळाकडुन मंजुर कामांचे प्रशासकिय आदेश काढणेत येतात सदरची कामे
सबंधित तालुक्या कडील बांधकाम उपविभागाकडुन करुन घेणेत येतात.
डोंगरी विकास कार्यक्रम
डोंगराळ व मागास भागांचे विकासाकरीता
शासनाने डोंगरी विकास कार्यक्रम जाहीर केला सदर योजनेंतर्गत
धुळे जिल्हयातील
धुळे व शिंदखेडा वगळता उर्वरित साक्री , शिरपुर
तालुक्यांचा समावेश करणेत आलेला आहे या योजने करीता शासन जिल्हाधिकारी जिल्हा
नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेस निधी वितरीत करणेत येतो.
या योजनेंतर्गत डोगराळ व मागास भागातील रस्ते शाळा इमारती शाळा दुरुस्ती सामाजिक
सभागृह , शाळाकंपाऊंड इ.स्वरुपाची कामे सबंधित तालुक्याचे आमदार यांचे कडुन
जिल्हा नियोजन मंडळाकडे सुचविणेत येतात त्यानुसार जिल्हानियोजन मंडळाकडुन
मंजुर कामांचे
प्रशासकिय आदेश काढण्यात येतात .सदरची कामे सबंधित तालुक्यातील बांधकाम उपविभगाकडुन
करुन घेण्यात येतात.
या योजनेंतर्गत प्रत्ये आमदार यांना दरसाल प्रत्येक गटासाठी
रक्कम रु.50.00 लक्ष इतका निधी वितरीत करणेत येतो.
खासदारांचा स्थानिक विकास
कार्यक्रम (लोकसभा - राज्यसभा)
धुळे जिल्हयातील धुळे व नंदुरबार असे
दोन मतदार संघामध्ये विभागणी करणेत आली असुन धुळे मतदार संघातील
धुळे शहर व ग्रामीण भागाचा शिंदखेडा /धुळे
/साक्री
या तालुक्यांचा
समावेश होतो. या योजनेखाली प्रती खासदर दरसाल रक्कम रु.2.00 कोटीचा निधी
वितरीत करणेत येतो .सदरचा निधी जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन समिती यंाचे
कडुन वितरीत
करण्यात येतो.
या योजने खाली या मध्ये मतदार संघातील रस्ते खडीकरण व डांबरीरण करणे व्यायामशाळा
सांस्क्रूतीक हॉल समाजमंदिरे आर.सी.सी.गटारे वेगवेगळया वॉल कंपाऊंड मोरी
बांधकामे निवाराशेड स्मशान शेड अशा स्वरुपाची कामे या अनुदानातुन करणेत
येतात.
सदरची कामे मा.खासदार यांचे कडुन जिल्हा नियोजन मंडळाकडे सुचविणेत येतात
त्यानुसार जिल्हा नियोजन मंडळाकडुन मंजुर कामांचे प्रशासकिय आदेश काढणेत
येतात .सदरची
को सबंधित तालुक्या कडील बांधकाम उपविभागाकडुन करुन घेणेत येतात.
जिल्हा
परिषद स्व-निधी
- जिल्हा परिषद सदस्यासाठी त्यांचे
मतदार संघातील विकास कामासाठी उदा.रस्ते सामाजिक सभागृह कंपाऊंड
,विशेष दुरस्त्ी
करणेसाठी प्रत्येक जिल्हा परिषद
सदस्यांना रक्कम
रु.5.00लक्ष निधी पर्यंतची कामे सुचविता येतात त्याप्रमाणे सुचविलेल्या
कामांचे ज्या त्या तालुक्यातील बांधकाम उपविभाकडुन अंदाजपत्रकाप्रमाणे
त्यास मंजुरी
घेऊन कामे केली जातात
- धुळे जिल्हा परिषद स्वनिधीच्या उत्पनातुन जिल्हा परिषद
प्रशासकिय इमारत रु.05.00 लक्ष इमारत देखभाल व दुरुस्त्ीसाठी
निधी खर्च केला
जातो.
उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ
मुंबई महाराष्ट्र राज्याच्या प्रादेशिक असमतोल
दुर करणेसाठी मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे नियंत्रणा
अंतर्गत वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत.यामध्ये
1)विदर्भ वैधानिक विकास मंडळ 2) मराठवाडा वैधानिक विकास मंडळ
3) कोकण वैधानिक विकास मंडळ 4) उर्वरित महाराष्ट्र वैधानिक
विकास मंडळ या विकास मंडळांचा समावेश आहे.
धुळे जिल्हयाचा उर्वरित महाराष्ट्र
विकास मंडळ अंतर्गत समावेश केलेला आहे.या मंडळाचे प्रमुख प्रशासकिय
कार्यालय नविन प्रशासकिय इमारत 17 वा मजला मंत्रालयासमोर मुंबई
-32 येथे आहे.
उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळांचे अंतर्गत 1) ग्रामपंचायत कार्यलये 2)
अंतर्गत रस्ते 3) गांव अंतर्गत गटार बांधकाम करणे 4) सामाजिक सभागृह बांधणे तसेच
आमदानिधी अंतर्गत शासन निर्णयानुसार जी कामे हाती घेणेस अनुमती देणेत आलेली आहे
ती सर्व कामे वैधानिक विकास मंडळांचे अंतर्गत हाती घेता येतात.
उर्वरित वैधानिक मंडळांमार्फत जी कामे
शिफारस केली जातात त्या कामांना अर्थ व नियोजन विभागामार्फत
सबंधित विभागास (उदा.सार्वजनिक बांधकाम ग्रामविकास इत्यादी)निधी
वितरीत केला जातो..
या कामाची अंदाजपत्रके मा.सदस्य सचिव जिल्हा नियोजन व विकास मंडळ यांचे कडुन यांचे
मार्फत उर्वरित वैधानिक विकास मंडळाकडे पाठविणेत येतात.
सन 2004-05 अंतर्गत धुळे जिल्हा परिषदकडे उर्वरित वैधानिक विकास मंडळाचे शिफारशी
नुसार 42 कामांना मंजुरी मिळाली आहे .व या कामांची अंदाजित किंमत रु.207.02 लक्ष
इतकी आहे.
या पैकी मार्च 2007 अखेर रु.207.02 लक्ष इतका निधी उर्वरित वैधानिक विकास मंडळामार्फत
धुळे जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता.त्यापैकी रक्कम रु. 207.37 लक्ष इताका
निधी खर्च झालेला आहे.
उर्वरित वैधानिक विकास मंडळ
वर्ष |
कामे संख्या |
प्राप्त निधी |
खर्च निधी |
2005-06
|
20
|
109.56
|
100.81 |
2006-07
|
28
|
124.40
|
101.38 |
2007-08
|
16
|
103.77
|
48.79 |
2008-09
|
03
|
23.80
|
-- |
|
|
ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत
म.जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा
नियोजन समिती मार्फत तीर्थक्षेत्र घोषित करण्यात येते घोषित
केलेल्या तिर्थक्षेत्रांतर्गत भक्त निवास ,वाहन तळ ,शौचालय
,स्नानगृह ,धर्मशाळा ,पाण्याची टाकी , सभामंडप इ.कामास तांत्रिक
मान्यता मिळाल्यानंतर ग्राम विकास व जलसंधारण विभाग मंत्रालय
मुंबई यांचे मार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो.
सदर कामासाठी संपुर्ण प्रक्रिया आता
म. उप मुख्य कार्यकारी अधिकारी
(ग्राम पंचायत विभाग) जि.प.धुळे यांच्या मार्फत राबविण्यात येतात.
ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
अंतर्गत
वर्ष |
कामे
संख्या |
प्राप्त
निधी |
खर्च
निधी |
2005-06
|
2
|
12.76
|
12.16 |
2006-07
|
7
|
45.00
|
43.71 |
2007-08
|
35
|
225.26
|
83.94 |
|
|
|