| धुळे
जिल्हयात एकूण 551 ग्राम पंचायती असून 283 ग्राम सेवक व 75
ग्राम विकास अधिकारी 19 विस्तार अधिकारी कार्यरत आहेत.
ग्राम पंचायतीच्या एकूण उत्पन्नाच्या 15 टक्के निधी मागास वर्गीयाच्या कल्याणकारी
योजनेवर खर्च करण्यांत येतो तसेच 10 टक्के निधी महिला बाल कल्याण योजनेवर खर्च करण्यांत
येतो.
धुळे जिल्हयात 4 तालूके असुन तालूका
निहाय ग्राम पंचायती खालील प्रमाणे आहेत. 
ग्राम पंचायत विभाग प्रशासकीय रचना
ग्राम पंचायत विभाग ते ग्राम पंचायत पर्यंत
योजना खालील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत राबविण्यांत
येतात
कंत्राटी ग्राम सेवक यांची पदे भरण्यांबाबत
जिल्हा परिषदेमध्ये नवनिर्मित ग्राम विकास अधिकारी व कंत्राटी ग्राम सेवक यांची
पदे भरण्यांबाबत ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांचे कडील शासन निर्णय पदनि
/प्र.क्र 231 आस्था-8/ मंत्रालय मुंबई 4000032 दिनांक 14 ऑगस्ट 2008 च्या पत्रान्वये
धुळे जिल्हा परिषदेला कंत्राटी ग्राम सेवकांची 56 +8 = 64 पदे मंजुर करण्यांत
आलेली आहेत. व सदरची पदे दिनांक 28-9-2008 पर्यंत भरण्यांच्या सुचना देण्यांत
आलेल्या आहेत.
कंत्राटी ग्राम सेवकांची पदे भरती बाबत धुळे जिल्हा परिषदेने दिनांक 6/9/2008
रोजी दैनिक देशदुत या वृत्तपत्रात जाहिरात देण्यांत आलेली आहे. व सदरचे अर्ज दिनांक
15-9-2008 पर्यंत मागविण्यांत आलेले आहेत.
शासनाचे दिनांक 15-9-2008 चे पत्रान्वये
सदर पदे भरण्यांच्या प्रक्रीयेस स्थगिती देण्यांत आलेली आहे.
ग्राम पंचायत विभागा बद्दल माहिती
ग्राम पंचायत विभागाकडील मंजुर पदांची माहिती
ग्रामपंचायत विभागाकडील विस्तार अधिकारी (ग्रापं)/ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक
यासंवर्गातील गटनिहाय मंजुर/भरलेली /रिक्त पंदांची माहिती दर्शविणारा तक्ता ...
माहे डिसेंबर:- 2008 अखेर
1) संवर्ग-विस्तार अधिकारी (ग्रापं)
 2) संवर्ग- ग्रामविकास अधिकारी
 "टिप - महाराष्ट्र शासनाने दि.1/11/2008रोजीच्या निर्णयान्वये ग्रामविकास अधिकारी
यांची नव्याने 11 पदांची नवनिर्मिती केलेली आहे.ती रिक्त पदे
पैकी स्पर्धा परिक्षेतून 04पदे व 11पदे पदेन्नतीने असे एकूण
15 पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे.स्पर्धा परिक्षा दि. 18/1/2009
रोजी झालेल्या
आहेत."
3)संवर्ग- ग्रामसेवक

"टिप - महाराष्ट्र शासनाने दि.1/11/2008रोजीच्या निर्णयान्वये ग्रामविकास अधिकारी
यांची नव्याने 45 पदांची
नवनिर्मिती केलेली आहे. ती रिक्त पदाची दि. 23/11/2008 रोजी लेखी परिक्षा व दि.
10 व 11/12/2008
रोजी तोडी मुलाखती घेण्यात आलेल्या असुन गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना
नियुक्ती आदेश
निर्गमित करणेची कार्यवाही सुरु आहे."
ग्राम पंचायत कार्यालय इमारती बाबत माहिती.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना
महाराष्ट्रात
दिनांक 2 फेब्रुवारी 2006 पासून 12 जिल्हयात सुरु करण्यांत आलेली
आहे
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली गावाच्या विकाससाच्या
दृष्टीने विविध योजना गरजू मजूरांन व्दारे राबविण्यांत येतात
या साठी किमान 50 टक्के कामे करण्यांची जबाबदारी
ग्राम पंचायतीवर तसेच जिल्हयाचा संपूर्ण आराखडा मंजूर करण्याची जबाबदारी जिल्हा
परिषदे कडे सोपविण्यांत आलेली आहे.ही योजना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना
(मग्रारोहयो) या नावाने जिल्हयात राबविण्यांत येत आहे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना असुन या योजनेच्या
माध्यमातून स्थानिक मजूरांना रोजगार पूरविण्यांची व गावाच्या लोक सहभागातून पारदर्शी
पध्दतीने विकास करण्यांची संधी लाभली आहे.त्या प्रमाणे ग्राम पंचायती मार्फत या
योजने व्दारे जास्तीक जास्त कामे करुन ग्रामीण भागाचा आर्थीक व सामाजिक विकास
करणे सहज शक्य होईल.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत खालील प्रमाणे कामे घेता येतील.
- "जल
संधारणे वजलसंवर्धनाची कामे :- माती बांध, दगडीबांध, जाळीचे बांध, वनराई
बंधारे, जैविक बांध, शेततैळी, मातीचे धरणे, पाझर तलाव, साठवन
तलाव,
पाझर कालवे गावतलाव,भुमिगत बंधारे "
- "दुष्काळ प्रतिबंधक कामे:-(वनीकरणसहीत) पडीत जमीनीवर
वृक्ष लागवड,रस्त्याच्या बाजूला वक्ष लागवड"
- "ग्रामीण भागात बारमाही जोड रस्त्याची कामे ,जिल्हा
रस्ते गाव रस्ते गावातील अंतर्गत रस्ते शेत रस्ते रस्ता नुतनीकरण ,
रस्ता रुंदीकरण"
ज्या मजूरांची नोंदणी झालेली आहे. व ज्या मजूरांना कामाची आवश्यकता
आहे त्या मजूरांनी ग्राम पंचायतीमडे नमूना क्रमांक-4 मध्ये कामांची
मागणी
करावयाची .त्या
प्रमाण
नमुना नं.7 मध्ये ग्राम पंचायती कडून पोहोच ध्यावयाची आहे. मजूरांनी
केलेल्या कामांचे
मुल्यमापन करुन केलेल्या कामांच्या प्रमाणांत मजूरी देण्यांत यईल.
- मजूरांना पोष्टखाते किंवा बँकेत खाती उधडणेचे आहे .यापुढे
मजूरी ही पोष्टातून किंवा बँकेतूनच अदा करण्यांचे शासनाचे
आदेश आहेत.तरी मजूरांची
लवकरात लवकर पोष्टात
खाती उघडण्यांची आहेत.
यशवंत ग्राम समृध्दी योजना
सदर योजना सन 2002-2003 मध्ये सुरु झालेली आहे.
सदर योजनेत 227 ग्राम पंचायतींनी भाग घेतलेला असुन रस्ता कॉन्क्रीट करणांची कामे
करण्यांत आलेली आहेत.
यशवंत ग्राम समृध्दी योजना -
वर्षनिहाय प्राप्त अनुदान रु, लाखात जानेवारी 2009

यशवंत ग्राम समृध्दी योजना माहे :- जानेवारी 2009 - गटाना वितरीत 2251.34 लाख ,सन 2008-2009 मध्ये प्राप्त रक्कमे पैकी
रु.223.20 लाख वितरीत करण्यात आले
आहे. तसेच रु.252.14 लाख रक्कम कोषागारातून काढून गटांना वितरीत करण्यात आलेली आहे.

12 वा वित्त आयोग ग्राम पंचायत स्तर
12 वा वित्त आयोगातून ग्राम पंचायती मध्ये खालील प्रकारची कामे घेता येतात
- पाणी पुरवठा योजना दुरुस्ती व देखभाल
- गटारी व अनुशंगिक रस्ते दुरुस्ती व देखभाल.
- सार्वजनिक शौचालय दरुस्ती.
- ग्राम स्वच्ठता व धनकचरा व्यवस्थापन.
- धुरीकरण मशीन व त्यासाठी औषधी खरेदी
- ग्राम पंचायत कार्यालय देखभाल दुरुस्ती
- जलशुध्दी करण यंत्रे खरेदी व दरुस्ती
|