मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  
एकात्मिक बाल विकास सेवा योजना
     

प्रस्तावना

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची संकल्पना व स्थापना

  • 2 ऑक्टोबर 1975 साली एबाविसेयो ची उत्पत्ती झाली.
  • भारतात सर्वप्रथम अमरावती जिल्हयात सुरुवात झाली. महाराष्ट्रात सध्या 44983 अंगणवाडया कार्यरत आहेत. सामाय ग्रामिण भागात 1000 लोकसंख्या असणाऱ्या गावाला तसेच आदिवासी विभागातील 700 लोकसंख्या असलेल्या गावात 1 अंगणवाडी या प्रमाणात प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली.
  • बालक शरीराने सामाजिक दृष्टीने आणि मनाने एक सुसंवार्धित बालक तयार होईल आणि त्यातुन समाजात एक नविन उत्तम पिढी निर्माण होईल यासाठी सर्व विभागाने आपले कौशल्य पणाला लावूलाभार्थीची एकाच वेळी सर्वदृष्टीने काळजी घेणे हा एकात्मिकबालविकास सेवा योजना विभागाचा मुख्य उद्देश आहे.

प्रशासकिय रचना

 

उदिष्टये

  • 0 ते 6 वयोगटातील मुलाचा पोषक आहाराविषयक व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे
  • मुलांच्या योग्य मानसिक व शारिरिक समाजिक विकासाचा पाया घालणे
  • बालमृत्यू, मुलांचा रोगटपणा व कुपोषण, शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करणे
  • माताना पोषण आहार आणि आरोग्य शिखण देवून मुलाचे सर्वसाधारण आरोगय व पोषण आहार या संबधीच्या गोष्टीची काळजी घेऊ शकतील अशा प्रकारे क्षमता वाढविणे
  • बालविकासाला चालना मिळावी म्हणून विविध खात्यामध्ये धोरण व अंलबजावणी याबाबत समनवय घडवून आणाणे

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची सेवा तसेच लाभधारक

लाभधारक
सेवा
0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके 1. लसीकरण
2. आरोग्य तपासणी
3. संदर्भ सेवा
6 महिने ते 3वर्ष वयोगटातील बालके 1. पुरक पोषण आहार
2. लसीकरण
3. आरोग्य तपासणी
4. संदर्भ सेवा
3 ते 6 वर्षवयोगटातील बालके 1. पुरक पोषण आहार
2. लसीकरण
3. आरोग्य तपासणी
4. संदर्भ सेवा
5. अनौपचारिक शिक्षण
गरोदर व स्तनदा माता 1. आरोग्य तपासणी
2. गरोदरमातांना धनुर्वातप्रतिबधंक लसीकरण
3. संदर्भ सेवा
4. पुरक पोषण आहार
5. आहार व आरोग्य शिक्षण
15 ते 45 वर्ष वयोगटातील स्त्रीया 1. आहार व आरोग्य शिक्षण
11 ते 18 वर्षवयोगतील किशोर वयीन मुली 1.आहार व आरोग्य शिक्षण
(किशोरी शक्ती योजना) 2. पुरक पोषण आहार
3. स्त्रीया आणि मुलांच्या हक्काविषयीचे शिक्षण

योजना अमंलबजावणी / कार्यवाही

  • 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुले,15 ते 45 वयोगटातील गरोदर स्त्रिया व स्तनदा माता पुरक पोषण आहार देणे
  • 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुले,गरोदर स्त्रिया व स्तादा माता याना लसीकरणे करणे
  • 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुले,गरोदर स्त्रिया व स्तादा माता आरोग्य तपासणी करणे
  • 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुले,गरोदर स्त्रिया व स्तादा माता संदर्भ सेवा देणे
  • 3 ते 6वर्षे वयोगटातील मुले औपचारिक शिक्षण
  • 15 ते 45 वर्षे वयोगटातील स्त्रिया आरोग्य शिक्षण आणिक सकस आहार प्रशिक्षण
एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत राबविण्यात येणारी विशेष योजना

आपली अंगणवाडी अभियानाकरीता खालीलप्रमाणे वेगवेगळया स्तरावर समिती तयार करण्यात

जिल्हास्तर ( ग्रामीण )

आपली अंगणवाडी अभियानाचा आढावा घेण्यासाठी तसेच हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी जिल्हा पातळीवर एका समितीचे गठन करण्यात यावे. त्याची रचना खालीलप्रमाणे राहील.

1) सभापती, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद - अध्यक्ष
2) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) - सदस्य सचिव
3) बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण ) - सदस्य
4) कार्यकुशल मुख्यसेविका - सदस्य
5) जिल्हा आरोग्य अधिकारी - सदस्य
6) शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण - सदस्य
7) महिला व बाल विकास क्षेत्रातील उपक्रमशील NGO - सदस्य
8) कार्यकुशल अंगणवाडी सेविका - सदस्य

प्रकल्पस्तर (ग्रामीण)

आपली अंगणवाडी अभियानाचा आढावा घेण्यासाठी तसेच हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी प्रकल्प स्तरावर एका समितीचे गठन करण्यात यावे. त्याची रचना खालीलप्रमाणे राहील.

1) पचायत समिती सदस्य, महिला व बाल कल्याण - अध्यक्ष
2) बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) - सदस्य सचिव
3) मुख्यसेविका - सदस्य
4) वैद्यकीय अधिकारी - सदस्य
5) उपशिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण - सदस्य
6) महिला व बाल विकास क्षेत्रातील उपक्रमशील NGO - सदस्य
7) कार्यकुशल मुख्य सेविका - सदस्य
8) कार्यकुशल अंगणवाडी सेविका - सदस्य

ग्रामस्तर

आपली अंगणवाडीचे अभियान यशस्वी रित्या राबविण्यासाठी ग्राम स्तरावर एका समितीचे गठनकरण्यात यावे. त्याची रचना खालीलप्रमाणे राहील.

1) सरपंच - अध्यक्ष
2) अंगणवाडी सेविका - सदस्य सचिव
3) ग्रामसेवक - सदस्य
4) महिला ग्रामपंचायत सदस्य - सदस्य
5) वैद्यकीय अधिकारी / ए. ए. एम - सदस्य
6) बीट प्रमुख तथा मुख्य सेविका - सदस्य
7) अंगणवाडी माता समिती सदस्य - सदस्य

केंद्रीय माहिती कायदा 2005 अन्वये माहिती अधिकारी संपर्क

शासकीय माहिती अधिकारी

अ. क्र.
अधिकारीऱ्यांचे नाव
पदनाम
कार्यक्षेत्र पत्ता/फोन ईमेल अपिलीय अधिकारी
1
श्री. आर. एम. निकम कार्या.अधि. जिल्हा जि.प.धुळे
229997
---- उप मु.का.अ.(बाक) जि.प.धुळे

सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ. क्र.
अधिकारीऱ्यांचे नाव
पदनाम
कार्यक्षेत्र पत्ता/फोन ईमेल अपिलीय अधिकारी
1
श्री. आर. सी.अहिरे व.सहा. जिल्हा जि.प.धुळे
229997
---- ----

अपिलीय अधिकारी

अ. क्र.
अधिकारीऱ्यांचे नाव
पदनाम
कार्यक्षेत्र पत्ता/फोन ईमेल अपिलीय अधिकारी
1
श्री. डी. एन. रुपवते उप मु.का.अ.(बाक) जि.प.धुळे जिल्हा जि.प.धुळे
229997
---- मु.का.अ. जि.प.धुळे