मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  
कृषि विभाग
     

धुळे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र 8063 चौ. कि. मी असून राज्याच्या एकुण क्षेत्रापैकी 2.6 % क्षेत्र व्यापलले आहे. धुळे जिल्हयाचे हवामान उष्ण व कोरडे असून 2007 मधील सरासरी पर्जन्यमान 783 मि. मी होते. पुर्वी पश्चिम खान्देश या नावाने ओळखला जाणारा धुळे जिल्हा तापी नदीच्या वरच्या खो-यात वायव्य दिशेला वसलेला आहे. धुळे जिल्हयाच्या पुर्वेस जहगांव जिल्हा , दक्षिणेस नाशिक जिलहा उत्तरेस मध्य प्रदेशातील नेमाड जिल्हा व पश्चिमेस नंदुरबार जिल्हा आहे. धुळे जिल्हा सर्वसाधारणपणे त्रिकोणी आहे. जिल्हयाचे भौगोलिकदृष्टया उंचसखलपणा, हवामान व पर्जन्यानुसार जमिनीचे प्रतीनुसार दोन विभाग पडतात. पहिला विभाग हा सधन तापी
खो-याचा पटटा असून शिरपुर आणि शिंदखेडा तहसिलचा काही भाग यात मोडतो. हा सिंचन सोयींनीयुक्त असा सुपीक प्रदेश आहे. दुस-या विभागात धुळे, साक्री व शिंदखेडा या तहसिलाचा काही भागांचा समावेश होतो. हा भाग सपाट असून तेथे जलसिंचन विकासास वाव आहे. समुद्र सपाटीपासून या जिल्हयाची उंची सुमारे 180 ते 215 मीटर आहे.

धुळे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र 733000 हे. असून पैकी जंगलव्याप्त क्षेत्र 209000 हे. आहे. भौगोलिक क्षेत्राशी जंगलव्याप्त क्षेत्राची टक्केवारी 25.52% आहे. तसेच शेतीला उपलब्ध नसलेली जमिन 33000 हे. असून पडीक जमिनीखालील 59000 हे. क्षेत्र आहे. पिकाखालील निव्वळ क्षेत्र 397000 हे. व निव्वळ ओलित क्षेत्र 50000 हे. आहे. जिल्हयाच्या लागवडीखालील जमिनीपैकी 286000 हे. क्षेत्र अन्नधान्य पिकांखालील आहे.

 

 

सर्वसाधारण माहिती

अ. क्र.
वर्ष
सरासरी पाऊस मि.मि
प्रत्यक्ष पडलेला पाऊस मि.मि.
सरासरी पावसाचे दिवस
धुळे
साक्री
शिंदखेडा
शिरपुर
एकुण

1

2005-06
544.0
318
687
388
603
499
34
2
2006-07
566.30
663
862
1009
1137
917
46.5
3
2007-08
566.30
664
755
701
1012
783
38.25

 


धुळे जिल्हयातील गत तीन वर्षातील पिकाखालील पेरणी क्षेत्र माहिती ( आकडे हेक्टरमध्ये)

अ. क्र.
पिकाचे नांव
सरासरी
क्षेत्र
2005-06
2006-07
2007-08
सन
2008-09 मधील क्षेत्र हे.
1
भात
5000 3159 6555 3820 5870
2
खरिप ज्वारी
35400 30524 28620 32957 17690
3
बाजरी
131600 125448 127100 88894 129170
4
नागली
7600 2500 3250 1500 4400
5
मका
4800 47679 36065 46092 31880
6
इ.ख. तृणधान्ये
2500
2985
1683
1317
2360
7
एकुण तृणधान्यें
188400
211495
203973
174580
191370
8
तुर
7200 6294 7345 9790 6005
9
मूग
18600
98084
17935
21004
16900
10
उडीद
9700
8133
6920
9765
6543

11

इ.ख. कडधान्ये
11900
4277
5530
5694
3830
12
एकूण कडधान्ये
48400
36788
37730
46253
33278
13
एकुण अन्नधान्ये
236800
248283
241703
220833
224648
14
भुईमुग
36100
23465
38045
35189
18055
15
तीळ
10200
7183
7695
8266
3982
16
सूर्यफुल
300
60
61
13
425
17
खुरासणी/कारळा
100
0
260
10
7
18
सोयाबिन
2000 3872 5925 12957 17980
19
इ. ख. गळीतधान्ये
300
303
209
801
235
20
एकुण ख.गळीतधान्ये
49000
34883
52195
57236
40684
21
कापूस 65600
86018
96965
115121
109879
22
ऊस
5500
6654
14258
--
7814
23
एकुण खरीप
356900
375838
390863
393190
383025
24
रब्बी ज्वारी
7200
7985
9725
6612 --
25
गहू
11600
13835
13950
35365 --
26
रब्बी मका
700
375
235
962 --
27
इ.र. तृणधान्ये
200
82
60
121 --
28
एकुण तृणधान्यें
19801
22277
23970
43060 --
29
हरभरा
12500
10615
17140
23230 --
30
इ.र. कडधान्ये
100
1985
1382
864 --
31
एकुण र. कडधान्य
12600
12600
18522
24094 --
32
एकुण र. अन्नधान्ये
32300
34877
42492
67154 --
33
रब्बी तीळ 100
0
0
0 --
34
रब्बी करडई 0
18
18
190 --
35
जवस
0
0
0
0
--
36
सुर्यफुल
200
46
63
46 --
37
इ.र. गळीतधान्ये
300
65
18
141 --
38
एकुण र. गळीतधान्ये 600
129
99
377 --
39
उन्हाळी भुईमुग 4900 2471 6960 10868 --
40
उन्हाळी सुर्यफुल
100
14
38
29 --
41
उन्हाळी मका
100
63
453
380 --

 


जिल्हयातील कृषि निविष्ठा ( बियाणे खते व किटकनाशके) -

मे 2008 अखेर परवानाधारक संख्या:-

बियाणे
रासायनिक खते
किटकनाशके
1107
1097
880
कृषि निविष्ठा गुणनियंत्रण कार्यक्रम सन 2008-09 (16जून-08 अखेर)
निविष्ठा प्रकार
केलेली तपासणी
काढलेले नमुने
परवान्यावरील कार्यवाही
लक्ष
साध्य
विक्रीबंद
रद्द/ निलंबन
बियाणे
105
104
39
11
-
रासा. खते
53
73
9
21
02 रद्द
किटकनाशके
02
21
2
-
-

 


कृषि विभागाच्या योजना-

अनुसूचित जाती उपयोजना (SCP) :-
दा
रिद्रय रेषेच्याखाली असणा-या जाती/ नवबौध्द शेतक-यांचे उत्पन्न वाढुन त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणण्यासाठी या उद्देशाने सदरची योजना राबविण्यात येत आहे.

लाभार्थी निवडीसाठी निकष -

  • लाभार्थी शेतकरी हा अनुसूचित जाती /नवबौध्द शेतकरी असावा.
  • लाभार्थी शेतक-यांच्या स्वताच्या नावे जमिन असावी.
  • लाभार्थीच्या स्वताच्या नावे कमाल 6.00 हेक्टर जमिन असणे आवश्यक.
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळिकरण योजनेच्या लाभार्थीना प्राधान्य.
  • लाभार्थीच्या नावे वार्षिक उत्पन्न रु. 20,000/- आत असावे.
  • लाभार्थीच्या मागणी नुसार रु.30,000/- चा लाभ देता येतो किंवा नविन विहिर या बाबीचा लाभ घेतल्यास रु. 60,000/- पर्यन्त अनुदान देय आहे.
  • निवड केलेल्या लाभार्थीस दोन वर्षाच्या कालावधीत लाभ देय.

अनुसुचित जमाती उपयोजना व ओटीएसपी योजना (TSP व OTSP):-

दारिद्रय रेषेच्याखाली असणा-या अनुसुचित जमाती व आदिवासी शेतक-यांचे उत्पन्न वाढुन त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणण्यासाठी या उद्देशाने सदरची योजना राबविण्यात येत आहे.

लाभार्थी निवडीसाठी निकष -

  • लाभार्थी शेतकरी हा अनुसूचित जमाती शेतकरी असावा.
  • लाभार्थी शेतक-यांच्या स्वताच्या नावे जमिन असावी.
  • लाभार्थीच्या स्वताच्या नावे कमाल 3.00 हेक्टर जमिन असणे आवश्यक.
  • लाभार्थी हा बीपीएल धारक असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थीच्या नावे वार्षिक उत्पन्न रु. 20,000/- आत.
  • लाभार्थीच्या मागणी नुसार मार्गेदर्शक सुचनेमधील विविध बाबीसाठी रु.30,000/- चा लाभ देता येतो किंवा नविन विहिरी या बाबीचा लाभ घेतल्यास कमाल रु. 60,000/- पर्यन्त अनुदान देय आहे.
  • निवड केलेल्या लाभार्थीस दोन वर्षाच्या कालावधीत लाभ देय.

 

अ.क्र.
बाब
अनुदानाची टक्केवारी
अनुदान मर्यादा रु.
1
जमीन सुधारणा (1 हेक्टर मर्यादेत) 100%
मृद संधारण निकषानुसार रु.20000/- हेक्टरी मर्यादेत
2
निविष्टा वाटप (1 हेक्टर मर्यादेत) 100%
रु.3000/-
3
पीक संरक्षण / शेतीची सुधारित औजारे 100% रु.5000/-
4
बैलजोडी / रेडे जोडी
100%
रु.15000/-
5
बैलगाडी 100% रु.10000/-
6
जुनी विहीर दुरुस्ती
100% रु.10000/- (नाबार्ड निकषानुसार)
7
इनवेल बोअरिंग 100% रु.20000/- (नाबार्ड निकषानुसार)
8
पाईपलाईन (300 मीटरपर्यंत) 100%
रु.10000/- (नाबार्ड निकषानुसार)
9
पंपसंच
100%
रु.20000/-
10
नवीन विहीर
100% रु.42000/- ते 61500/-
11
शेततळे 100%
रु.35000/- (मृद संधारण निकषानुसार)
12
पारसबाग कार्यक्रम (फलोत्पादन विभागाच्या निकषानुसार) 100% रु.200/- प्रति गुंठा
13
ताडपत्री पुरवठा
100% रु.10000/- शासन निश्चित दरानुसार
14
तारेचे कुंपण 100% रु.15000/-
15
तुषार / ठिबक सिंचन संच पुरवठा
100% रु.25000/- प्रती हेक्टर

 


केंद्रपुरस्कृत सधन कापूस विकास कार्यक्रम :-

कापूस पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढविणे तसेच कापूस पिकाखालील क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने सदरची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत खालील बाबींचा लाभ कापुस पिकाचे उत्पादन घेणा-या अल्प / अत्यल्प / अनु.जाती जमाती व इतर शेतक-यांना घेता येईल.

अ.क्र.
योजनेतील घटक
अनुदानाचा तपशील
1
पीक संरक्षण आयुधे
 
 
हस्तचलित
किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु.800 प्रति नग
 
स्वंयचलित
किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु.2000 प्रति नग

 


केंद्रपुरस्कृत गळीतधान्य व कडधान्य विकास कार्यक्रम :-

गळीतधान्य व कडधान्य पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने सदरची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ गळीतधान्य व कडधान्य पिकाचे उत्पादन घेणा-या अल्प / अत्यल्प अनु.जाती, जमाती व इतर शेतक-यांना घेता येईल.

अ.क्र.
योजनेतील घटक
अनुदानाचा तपशील
1
जैविक खते पुरवठा
प्रति हेक्टर रु.50/-
 2
पिक संरक्षण आयुधे
किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु.800/-हस्तचलित आयुधासाठी रु.2000/- स्वंयचलित आयुधांसाठी
3
जिप्सम वाहतूक
प्रति हेक्टर रु.750/-
4
एचडीपीई पाईप
अनु.जाती / जमाती, महिला व अत्यल्प भुधारक शेतक-यांसाठी किंमतीच्या 50% किंवा रु.15000/- व इतर शेतक-यांसाठी 33% मर्यादित रु.10000/-
5
सुधारित कृषी औजारे

किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु.3000/-

 


केंद्रपुरस्कृत गतिमान मका विकास कार्यक्रम :-

मका पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्टॉर्च उद्योगांसाठी मोठी मागणी असल्याने मका पिकाखालील क्षेत्र व उत्पादकता वाढविणेच्या उद्देशाने सदरची योजना राबविणेत येत आहे. या योजनेचा लाभ मका पिकाचे उत्पादन घेणा-या अल्प / अत्यल्प अनु.जाती, जमाती व इतर शेतक-यांना घेता येईल.

अ.क्र.
योजनेतील घटक
अनुदानाचा तपशील
1
सुधारित कृषी औजारे
किंमतीच्या 50% किंवा रु.2000/-

 


केंद्रपुरस्कृत ऊस विकास योजना :-

ऊस पिकाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने सदरची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ ऊस पिकाचे उत्पादन घेणा-या अल्प / अत्यल्प अनु.जाती, जमाती व इतर शेतक-यांना घेता येईल.

अ.क्र.
योजनेतील घटक
अनुदानाचा तपशील
1
सुधारित कृषी औजारे
किंमतीच्या 50% किंवा रु.2000/-

 


केंद्रपुरस्कृत कृषि यांत्रिकीकरणाची योजना :-

कृषि क्षेत्रातील मजुरांच्या प्रश्नावर मात करून, शेतीकामाची वेळ व खर्च कमी करणे कृषि उत्पादन वाढविणेबरोबरच शेतीच्या यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे या उद्देशाने सदरची योजना जिल्हयात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 35 अश्वशक्ती क्षमतेचे ट्रॅक्टर्स, टॅ्रक्टरचलित औजारे स्वयंचलित औजारे इ. बाबीचा 25% अनुदानावर समावेश आहे.


राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम :-

पर्यावरण संतुलन राखणे, ग्रामीण भागात स्वच्छता राखणेस मदत करणे , स्त्रियांची कष्टापासून मुक्ती करणे , उत्कृष्ट प्रतीचे शेणखत उपलब्ध करणे व वृक्षतोडीस आळा घालणे इ. उद्दिष्टये समोर ठेवून सदरची योजना राबविणेत येत आहे.

अ.क्र.
कुटुंबातील व्यक्ती संख्या
लाभार्थींकडे उपलब्ध जनावरे संख्या
प्रतिदिन शेणाची उपलब्धता (कि.ग्रॅ.)
संयंत्राची क्षमता (घ.मी.)
करावयाच्या संयंत्राचे आकारमान (घ.फु.)
1
3 ते 4
2 ते 3
25
1
35
2
6 ते 8
4 ते 6
50
2
70
3
9 ते 11
7 ते 9
75
3
105
4
13 ते 15
12 ते 14
100
4
140
5
20 ते 22
15 ते 17
150
6
210

अनुदानाची मर्यादा : बायोगॅस संयंत्रासाठी 1 ते 10 घ.मी.क्षमतेच्या बांधकामासाठी खालीलप्रमाणे अनुदानाचा लाभ घेता येईल.

अ.क्र.
लाभार्थी प्रकार
अनुदान मर्यादा (प्रति संयंत्र)
1
अनुसुचित जाती / जमाती, अल्प / अत्यल्प भूधारक व भूमिहीन शेतकरी
रु.3500/- (2 घ.मी.क्षमतेच्या संयंत्रासाठी)
2
सर्वसाधारण लाभार्थी
रु.2700/-
3
शौचालय जोडणीसाठी अतिरिक्त अनुदान

रु.500/-

प्रकरणासोबत जोडावयाचे कागदपत्र :

  • लाभार्थीचा अर्ज
  • जागेचा उतारा (ग्रा.पं.नमुना नं.8)
  • ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांची शिफारस
  • अल्प / अत्यल्प भूधारक, भूमिहीन शेतमजूर असलेबाबत ग्रा.पं.दाखला
  • शेतजमीनीबाबत खातेउतारा
  • अनु.जाती / जमाती लाभार्थी असल्यास जातीचा दाखला

जिल्हा परिषद,धुळे (कृषि विभाग) - कृषि समिती - सभा तपशिल

अ.क्र.
समिती /सभा नांव
सदस्य यादी
समिती/ सभा कालावधी
1
कृषि समिती
  
मासिक सभा
2
  
3
  
4

  

5

  

6

  

7

  

8

  

9

  

10

  

11