| जिल्हा
परिषद धुळे पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हयातील पशुधनांना 41
पशुवैद्यकिय दवाखाने श्रेणी -1 व 32 श्रेणी -2 अशा एकूण 73
पशुवैद्यकिय दवाखान्यासह आदिवासी उपयोजनेअंतर्गत एका फिरते
पशुचिकित्सालया मार्फत सेवा देण्यात येते. धुळे, नंदुरबार
व जळगांव जिल्हयासाठी विभागिय सधन कुक्कुट विकास प्रकल्प
धुळे येथे कार्यरत आहे. जिल्हयातील सर्व पशुवैद्यकिय दवाखान्यामार्फत
पशुपालकांना पशुसंव्ार्धन मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात
येते. सधन कुक्क्ट विकास प्रकल्पामार्फत जिल्हयातील ग्रामीण
क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भुधारकासह दारिद्र रेषेखालील
पशुपालकांना सवलतीच्या दरात उबवणूकीसाठी अंडी पुरविण्यात
येतात तसेच सुधारित जातीचे नर कोंबडे देखील उपलब्धतेनुसार
सवलतीच्या दरात पुरविण्यात येत असतात. प्रक्षेत्रावर कुक्कुटपालना
विषयी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात.
उपरोक्त सेवांसह पशुसंवर्धन विभागाकडून दोन मुख्य योजना राबविण्यात
येतात.
1) पशुवैद्यकीय सेवा / सुविधा
2) पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजना
कृत्रिम रेतन व अनुषंगिक सेवा
जातिवंत जनावरांच्या पैदाशीकरीता गाय व म्हैस वर्गातील जनावरांमध्ये गोठीव वीर्यमात्रा
वापरून कृत्रिम रेतन केले जाते. त्याचबरोबर निकृष्ट प्रतीच्या
जनावरांची अनावश्यक पैदास थांबविण्याकरीता वळूंचे खच्चीकरण
केले जाते.
औषधोपचार व लसीकरण
जनावरांचे स्वास्थ्य उत्तम राहणेकरीता व आजारी जनावरांना उपचार
करणेकरीता शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये
औषधसाठा उपलब्ध करून देण्यात येतो. तसेच घटसर्प, फ-या, आंत्रविषर,
लाळखुरकुत, पी.पी.आर, मनमोडी, देवी, लासोटा इ. रोगप्रतिबंधक
लसीकरण केले जाते.
शेळया मेंढयांना जंतनाशके पाजणे
शेळया व मेढयांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक औषध मोफत पाजण्यात
येते त्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढून मर्तुक थांबते
तसेच उत्पादन व प्रजनन क्षमतेत वाढ होते.
प्रयोगशाळा
जनावरांचे रोगनिदान तात्काळ होणेसाठी तालुकास्तरावर प्रयोगशाळेची
स्थापना करणेत आलेली आहे. त्यामध्ये रक्त शेण लधवी रक्तजल
इ. ची तपासणी नाममात्र सेवाशुल्क आकारून केली जाते.
वंधत्व निवारण शिबीरे / कार्यमोहिम शिबीरे
गाव पातळीवर जनावरांमधील वंधत्व व आजार निवारण करणेसाठी शिबीरांचे
आयोजन केले जाते त्यात औषध उपचार व औषधपूरवठा केला जातो.
विषय समिती सभा तपशिल
अ.क्र. |
सभा
|
सदस्य यादी
|
|
सभा कालावधी |
1 |
विषय समिती सभा |
सन्मा.श्री अरविंद विक्रम जाधव
|
सभापती |
दरमहा |
2 |
श्रीमती सुमनबाई माणीक पाटील
|
सदस्य |
3 |
श्री साहेबराव रामदास आहिरे
|
सदस्य |
4 |
श्रीमती शैलाताई रविंद्र पाटील
|
सदस्य |
5 |
श्रीमती रेखाबाई अमृत ईशी
|
सदस्य |
6 |
श्री नानाजी मोतीराम गायकवाड
|
सदस्य |
7 |
श्री ज्ञानेश्वर मधुकर सुर्यवंशी
|
सदस्य |
8 |
श्री सचिन त्र्यंबकराव बेडसे
|
सदस्य |
9 |
श्री प्रभाकर देवराम पाटील
|
सदस्य |
|
|
विभागाची
रचना


विभागाच्या योजना
अस्कॅड योजना ASCAD (Assistance to State
for Control of Animal diseases)
पशु रोग नियत्रंणासाठी राज्यांना सहाय्य या केंद्र शासनाच्या
योजनेअंतर्गत जिल्हयातील सर्व पशुधनास लाळयाखुरकत रोगाच्या प्रतिबंधक
लसमात्रा मोफत पुरविण्यात येतात सदर लसीकरणासाठी रू 1/- प्रमाणे
प्रति जनावर सेवाशुल्क आकारण्यात येते.
माहिती, शिक्षण व जनसंपर्क अंतर्गत एकदिवशीय चर्चासत्र शिबीर
पशुसंवर्धन व पशु आरोग्य रक्षण विषयक प्रगत तंत्रज्ञानाची माहिती
पशुपालकांना पोहोचविणे व पशूपालकांच्या स्थानिक अडचणीबाबत मार्गदर्शनासाठी
तालुकास्तरावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले जाते.
स्वयंरोजगार प्रशिक्षण
दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुकुटपालन वराहपालन इ. विषयांचे प्रशिक्षण
पशुसंवर्धन विभागातील विविध तज्ञांमार्फत सात दिवस प्रशिक्षण
दिले जाते त्याकरिता मागासवर्गीय व दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थींना
रू. 100/- व इतरांना रू. 200/- नोंदणी शुल्क आकारल जाते.
सदर प्रशिक्षणार्थींना मा. आयुक्त पशुसंवर्धन यांचेमार्फत प्रमाणपत्र
प्रदान केले जाते.
वैरण विकास योजना
पशुपालकांना जनावरांचे करीता सकस वैरण उत्पादनासाठी सुधारीत बियाणांचे
वाटप अनुदानावर पशुवैद्यकिय दवाखान्यामार्फत केले जाते. आफ्रिकन
टॉल ल्यूसर्न कडवळ चवळी इ. बियाणांचा पुरवठा केला जातो.
उबवणुकीची अंडी वाटप योजना
परसातील कुक्कुट पालनाकरीता उत्कृष्ट प्रजातीच्या वनराज, गिरीराज
इ. जातीच्या उबवणुकीची अंडयाचे पशुवैद्यकिय दवाखान्यामार्फत वेळोवेळी
शासनाने निर्देशित केलेल्या दरानूसार वाटप केले जाते.
बिगर आदिवासी योजना संकरीत कालवडी / म्हशींच्या पारडयांना पशुखाद्य
वाटप करणे.
सदर योजनांतर्गत विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रमांतर्गत संकरीत कालवडी व सुधाीरीत
म्हशीच्या पारडयांची जोपासना करण्यासाठी अर्थसहाय्य यांतर्गत पशुखाद्य वाटप करण्यात
येते.
सदर योजनेच्या मार्गदर्शक सुचना खालील प्रमाणे आहे.
- लाभार्थींचे अर्ज, कालवडी
/ पारडी संबंधी सर्व पहाणी, कागदपत्रे, प्रशिक्षण देण्याची योजना गावपातळीवर
पशुधन विकास अधिकारी (विस्तार) करतील.
- अल्पभुधारक, अत्यल्पभुधारक व शेतमजुर यांचेकडील संकरीत
कालवडीसाठी वयाच्या चौथ्या महिन्यापासुन ते 32 महिन्यापर्यंत
व म्हशीच्या पारडयांसाठी वयाच्या चौथ्या
महिन्यापसुन ते 40 महिन्यापर्यंत पशुखाद्याच्या स्वरुपात अल्पभुधारक
व अत्यल्प भुधारकास 50 टक्के आणि भुमिहिन शेतमजुरास 66.66
टकके अनुदान देण्यात येईल. कालवडीस
/ पारडीस ज्या वयापासुन खाद्य देणे सुरु होईल त्या प्रमाणात त्यांना
तिमाही खाद्य मंजुर करण्यात येईल.
- लाभधारकाकडुन त्यांच्या हिश्श्याची रककम स्वत:कडुन अथवा
बँकेकडुन कर्ज घेवुन आल्याशिवाय अनुदान मंजुर होणार नाही.
- संकरीत कालवडी / पारडीचा विमा उतरविणे आवश्यक आहे. विमा
उतरविण्यासाठी लाभार्थीने बँकेचे कर्ज असेल तेंव्हा 1.00
टकके व बँकेचे कर्ज नसेल
तेंव्हा 1.25 टकके या
प्रमाणात विम्याची रककम भरावयाची आहे.
- लाभार्थीस 3 दिवसीय प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणासाठी
प्रतिदिन 25/- याप्रमाणे रु.75/- अनुज्ञेय आहे. तसेच प्रशिक्षणार्थींस
त्यांच्या
गावाहुन प्रशिक्षण
केंद्रावर येण्या जाण्याचा प्रत्यक्ष प्रवास खर्च किंवा जास्तीत
जास्त रु. 15/- या पैकी जे कमी असेल ते देण्यात येईल. प्रशिक्षणार्थीस
रु.10
ची स्टेशनरी पुरविण्यात
येईल.
विशेष घटक योजना दुधाळ जनावरांचा गट वाटप
गावातील किमान 5 अनुसूचित व नवबौध्द लाभार्थ्यांना
दुधाळ जनावरांचा गट (3गायी किवा 3 म्हशी) 50 टक्के अनुदानावर
एक वर्षाच्या
विम्यासह वाटप करणे अनुदानाची
जास्तीत जास्त रक्कम तीन गायी साठी रू. 22590/- व तीन म्हैशींसाठी 25710/-
आहे.
योजनेचे नियम व अटी :
- सदर योजने अंतर्गत दारिद्र रेषेखालील अनुसूचित
जातीय नवबौध्द लाभार्थीस लाभ मिळेल. (मा.प्रांताधिकारी यांचा
दाखला)
- एका कुटुबातील एक पेक्षा अधिक व्यक्तिंना अर्ज करता
येणार नाही व लाभ मिळणार नाही्
- एका गावातून किमान 5 लाभार्थीची निवड करणेत येईल.
- गाय म्हैस नाबार्डच्या निकषानूसार किमतीवर मुल्यांकन
व त्यावर आधारीत अनुदान नियमानूसार मिळेल.
- प्रत्यक्ष खर्च अधिक झाल्यास लाभार्थिस स्वत:ला
करावा लागेला.
- प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया व विमा इ. कागदपत्रे
जनावरांचे फोटोसह पूर्ण केलेची खात्री
पटवलेवरच अनुदान वितरीत केले जाईल.
- तिन वर्षापर्यत जनावरांची परस्पर विल्हेवाट
विक्री करता येणार नाही. त्या अवधित
विमा क्लेम झाल्यास त्या रकमेतून पुन्हा
नविन
गाय व म्हैस
घ्यावी
लागेल.
- दर तीन महिन्यानी पशुधन विकास अधिकारी विस्तार यांना
योजनेतील पशुधनाची स्थीती दाखवून व मार्गदर्शनानुसार
व्यवसाय करावा
लागेल.
- प.वि.अ. (विस्तार) खात्याचे अधिकारी यांचे सल्ल्यानुसार
औषघोपचार लसीकरण करून घ्यावे लागेल.
- जनावरांसाठी गोठयाची सोय निवारा करणेची क्षमता
असावी.
- दुग्ध व्यवसाय करावयाचा असल्याने सकस वैरणीच्या
उपलब्धतेसाठी सुधारित वैरण पिके घेणेकामी पाण्याच्या
सोयीसह शेतजमीन
असल्यास व्यवसाय फायदेशिर
ठरेल.
- दि. 1 मे 2001 नंतर त्या लाभार्थीस तिसरे अपत्य
झाले नसलेबाबत ग्रामपंचायत दाखला आवश्यक
- लाभार्थीचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
- योजनेच्या अटी मान्य असलेबाबत रू. 20/- अथवा
अधिक चे स्टॅपवर करार करून द्यावा लागेल.
शेळी गट वाटप योजना :
योजनेच्या नियम व अटी :
- सदर योजने अंतर्गत दारिद्र रेषेखालील अनुसूचित
जाती नवबौध्द लाभार्थीस लाभ मिळेल.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल.
- शेळी पालनासाठी स्वत:ची जागा आवश्यक आहे शेतमजूर असल्यास
शेतमालकांचे संमतीपत्र.
- ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखला.
- दिनांक 1/5/2001 नंतर तिसरे अपत्य नसलेबद्दल ग्रामसेवकाचा
दाखला.
- तीन वर्षापर्यंत शेळी विकता येणार नाही.
- शेळयांची खरेदी स्थानिक बाजारात पशुधन विकास
अधिकारी (विस्तार) यांचे सहमतीने करणेची
आहे.
- शेळयांची खरेदी किंमत नाबार्डच्या शिफारसीप्रमाणे
ठरविली जाईल. व त्यावर 50 टक्के अनुदान
मंजूर करणेत येईल.
पशुसंवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय व अन्य प्रकारच्या सुविधा पुरवविण्यात येतात
. यापैकी काही ठरावीक सुविधांना नामामात्र सेवाशुल्क आकरले जाते
व अन्य सुविधा मोफत देण्यात येतात. या सेवा शुल्कात वाढ करणे
व निशुल्क सेवेचा पुर्नविचार करुन अशा सेवांसाठी शुल्क आकारणे
बाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता.
पशुसंवर्धन विभागामार्फत
देण्यात येणा-या प्रचलीत सेवाशुल्काच्या दरात सुधारणा करण्यास
व निशुल्क सेवा सशुल्क करण्यास खालील प्रमाणे शासन मान्यता देण्यात
येत आहे.

उपरोक्त सेवा शुल्क आकारल्यामुळे जमा होणा-या सर्व रकमांची पावती देण्यात येते.
तसेच रोज जमा होणा-या रकमेचे रोख वहीत नोंदी ठेवण्यात येते व
आयुक्त पशुसंवर्धन यांच्या सुचनेनुसार बँकेत कोषागारात जमा करण्यात
येते.
हे आदेश दि.24/4/2000 या तारखेपासुन अमलात आहेत.
हे आदेश वित्त विभाग अनौपचारीक संदर्भ क्रप्रक/237/2000/व्यय-2/दिनांक
10/3/2000 अन्वये निर्गमित करण्यात येत आहेत.
पशुसंवर्धन विभागाची पुनरर्चना झालेली असल्याने विभागाअंतर्गत पशुपालकांना अत्याधुनिक
पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातुन तालुका स्तरावर
लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाची स्थापना करण्यात आलेली आहे.
सदर संस्थांमार्फत अत्याधुनिक उपकरणे खरेदी करुन पशुपालकांना
तांत्रिक पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सदर
सेवाबाबत सेवाशुल्क आकारणी करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन
होता.
पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणा-या सेवाशुल्काच्या दरात खालीलप्रमाणे सुधारणा
करण्यात येत असुन पशुवैद्यकीय संस्थांमार्फत ज्या अत्याधुनिक पशुवैद्यकीय सेवा नव्याने
पुरविण्यात येत आहेत त्याकरीता खालीलप्रमाणे सेवाशुल्क आकारण्यास सुरुवात करावी.
1)
कुक्क्ट पक्षांचे लसीकरण:-
यापुर्वीच्या
शासन निर्णयानुसार प्रती पक्षी लस रु.0.50 सेवाशुल्क आकारणी करण्यात
येत होती. परस कुक्कुट पालनासाठी व 100 पेक्षा कमी पक्षी
असणा-या शेतक-यांसाठी तसेच दारिद्रय रेषेखालील लाभार्थींना सेवाशुल्कातुन माफी
देण्यात आलेली होती. सदरची सेवाशुल्क माफी या शासन निर्णयानुसार
रद्द करण्यात येत असुन खालीलप्रमाणे
सुधारित सेवाशुल्काचे दर निश्चित करण्यात येत आहेत.
कोंबडयांच्या लसीकरणासाठी प्रती पक्षी प्रती लस रु. 0.10 सरसकट सर्व पक्षांकरीता
आकारावेत.
2) रक्त चाचण्या:-

उपरोक्त सेवा शुल्क आकारल्यामुळे जमा होणा-या सर्व रकमांची पावती देण्यात येते.
तसेच रोज जमा होणा-या रकमेचे रोख वहीत नोंदी ठेवण्यात येते
व आयुक्त पशुसंवर्धन यांच्या सुचनेनुसार बँकेत कोषागारात जमा
करण्यात येते.
हे आदेश सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या तारखेपासुन अंमलात येतील.
हे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. 481/2007 व्यय-2, दि.14/8/2007
अन्वये निर्गमित करण्यात येत आहेत.
|
|
शेळया
मेंढयांना जंतनाशक औषधी पाजणे |
वंध्यत्व निवारण शिबीरे |
|
|
| |
| संकरीत
कालवडींची जोपासना कार्यक्रम |
सन 2008-09 या वर्षात विशेष घटक योजनांतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनांतर्गत मंजुर
लाभार्थींची यादी
|