मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  
शिक्षण विभाग (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
     

रचना व कार्यपध्दती

 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचे प्रशासन

इ. 5 वी ते 10 वी अगर इ. 8 वी ते 10 वी या वर्गांच्या शाळांना माध्यमिक शाळा, इ. 11 वी / इ. 12 वी च्या वर्गाला उच्च माध्यमिक अगर कनिष्ठ महाविद्यालये असे म्हणतात.

माध्यमिक शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्याला वर्ग 1 कचे शिक्षणाधिकारी ( माध्य. ) हे पद शासनाने नव्याने निर्माण केले. तसेच बृहंमुंबईचे तीन भाग करुन प्रत्येक विभागाला एक शिक्षण निरीक्षकाचे पद मंजूर केल्ो आहे. त्यांच्याकडे माध्यमिक शाळांची तपासणी व त्यांना अनुदान देणे ही कामे देण्यांत आली आहेत.

उच्च माध्यमिक विभागासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयांत वर्ग 1 चे साहाय्यक संचालक हे पद निर्माण करण्यांत आले आहे.

विभाग - शिष्यवृत्ती योजना व शैक्षणिक सवलती

शैक्षणिक सवलती व शिष्यवृत्ती प्रकार
पात्रतेचे निकष
ग्रामीण भागातील हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
(प्रकार - Nat.Rur.E.)
या शिष्यवृत्ती अंतर्गत प्राथमिक स्तरापासुन महाविद्यालयीन स्तरापर्यंत शिष्यवृत्त्या प्रदान केल्या जातात. शासन निर्णय क्र. एससीएच/1095(8485)माशि 8 दिनांक 2/8/1995 नुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या प्रत्येक शैक्षणिक स्तरावर 10 संच मंजूर करण्यांत आले असुन त्याचे दर खालील प्रमाणे आहेत.

1 ) इ. 5 वी ते 7 वी रु. 50/- दरमहा
2 ) इ. 8 वी ते 10 वी रु. 75/- दरमहा.
3 ) इ. 11 वी ते 12 वी रु. 100/- दरमहा.

सदर शिष्यवृत्ती म. रा. परिक्षा परिषदे मार्फत पुर्व माध्यमिक स्तरावर 4 थी मध्ये घेण्यांत येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत गुणवत्तेत येणाऱ्या इ. 5 ते 7 वी पर्यंत, माध्य. स्तरावर इ. 8 ते 10 वी पर्यंत, उच्च माध्य. स्तरावर इ. 8 वी ते 12 वी सदर शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. सदर शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षात 10 महिन्यासाठी दिली जाते.
पूर्व माध्यमिक माध्यमिक शिष्यवृत्ती ( प्रकार J व K ) गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुर्व माध्यमिक / माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यासाठी खुल्या गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना कार्यान्वित आहे. पुर्वमाध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परिक्षा ( इ. 4 थी ) व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परिक्षा ( इ. 7 वी ) म. रा. परिक्षा परिषदेमार्फत घेण्यांत येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत गुणवत्तेत येणाऱ्या पुर्व माध्यमिक स्तरावर इ. 5 ते 7 पर्यंत माध्य. स्तरावर 8 ते 10 पर्यंत ही शिष्यवृत्ती देण्यांत येते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या समाधानकारक प्रगती व चांगल्या वर्तणूकीच्या आधारे पुढे चालू राहते. शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षात 10 महिन्यासाठी दिली जाते. त्याचे दर खालील प्रमाणे आहेत.

1 ) इ. 5 वी ते 7 वी रु. 25/- दरमहा
2 ) इ. 8 वी ते 10 वी रु. 40/- दरमहा.
ग्रामीण भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यृत्ती
( प्रकार - A,B,C,D )
सदर शिष्य्वृत्ती योजनेंतर्गत इ. 7 वी अखेर घेण्यांत येणाऱ्या माध्यमिक शिष्यवृत्तीच्या स्पर्धात्मक परिक्षेच्या आधारे इ. 8 वी पासून सदर शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांच्या समाधानकारक प्रगतीच्या आधारे इ. 12 वी पर्यंत सदर शिष्यवृत्ती पुढे चालू राहते. त्यात खालील प्रमाणे प्रकार मंजूर केले जातात.

अ (A ) प्रत्येक सामुहिक विकास गटास सर्वसाधारण
अ (B ) प्रत्येक विकास गटातील अनुसूचित जातीतील मुलास
अ (C ) प्रत्येक सामुहिक विकास गटातील भूमीहीन शेतमजुराच्या मुलांस
अ (D ) जनजाती विकास गटातील अनुसूचित जमातीच्या मुलांस सदर शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षात 10 महिन्यासाठी दिली जाते. त्याचे दर खालील प्रमाणे आहेत.

1 ) इ. 8 वी ते 10 वी रु. 30/- दरमहा
2 ) इ. 11 वी ते 12 वी रु. 60/- दरमहा.
आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शालांत परिक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्त्ती आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील हुशार मुला-मुलींना ते माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण घेता यावे या साठी शासन शिक्षण व युवकक्रिडा मंत्रालय, मुंबई इबीसी/147829223/35/ दिनांक -28/8/1978 व शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एससीएच/1095/(86/95)दि.15 आक्टो.1996 अन्वये सदर शिष्यवृत्ती साठी धुळे जिल्ह्यांस शाखानिहाय ( विज्ञान - 52, कला - 11, व वाणिज्य - 22 ) असे एकुण 85 विद्यार्थ्यांचा संच मंजूर असून सदर शिष्यवृत्तीचे निकष खालील प्रमाणे.

1 ) माध्यमिक शालांत परिक्षेत पहिल्याच प्रयत्नांत व किमान 50 % गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांस शिष्यवृत्तीस पात्र समजले जाईल.
2 ) अशा विद्यार्थ्यांना पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 30,000. च्या मर्यांदेत असावे.
3 ) गुणवत्ता शिष्यवृत्तीचा कालावधी फक्त 2 वर्षासाठी ( अकरावी व बारावी ) असुन फक्त 10 महिन्यांसाठी अनुज्ञेय आहे.
4 ) इ. 11 वी मध्ये 50 % गुण मिळवून पहिल्या प्रयत्नांत उत्तीण् होणाऱ्या अशा शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती इ. 12 वी मध्ये पुढे चालू राहील. सदर शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षात 10 महिन्यासाठी दिली जाते. . त्याचे दर खालील प्रमाणे आहेत.

1 ) इ. 11 वी ते 12 वी मुले रु. 80/- दरमहा.
2 ) इ. 11 वी ते 12 वी मुली रु. 100/- दरमहा.
आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन महाराष्ट्र शासन समाज कल्याण सांस्कृतिक कार्य खेळ व पर्यंटन विभाग, मंत्रालय, मुंबई - 32 यांचेकडील ठराव क्र. टी.एस.पी.1377 इडी 22607/ 1208 ( UO )दिनांक 11/8/1977 अन्वये इ. 5 वी ते 10 वी पर्यंतच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सदर योजना राबविण्यांत येते. सदर योजनेसाठी पात्रतेचे निकष खालील प्रमाणे.

1 ) विद्यार्थी हा मागील इयत्तेत संपूर्ण विषयांत पास झालेला असावा.
2 ) त्याची उपस्थिती 75% किंवा त्यापेक्षा जास्त असावी.
3 ) त्याची वर्तणूक चांगली व प्रगती समाधानकारक असावी.
4 ) सदर योजनेचे दर खालील प्रमाणे आहेत.

इ. 5 वी ते 7 वी दरमहा रु. 40/-
इ. 8 वी ते 10 वी दरमहा. रु. 50/-

सदर सवलत शैक्षणिक वर्षात 10 महिन्यासाठी दिली जाते.
प्राथमिक शिक्षक पाल्यांना मोफत शिक्षण महाराष्ट्र शासन निर्णय शिक्षण व समाज कल्याण विभाग क्र. पीआरएई7067/एफ दिनांक 18 जून 1968 अन्वये प्राथमिक शिक्षक पाल्यांना मोफत शिक्षणाची योजना सुरु केली आहे. त्यात विहीत केलेल्या नियमानुसार 1968/69 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पुर्णवेळ कार्यरत असलेल्या शिक्षक पाल्यांना अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पुर्णवेळ मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी निशुल्क शिक्षणाची सवलत उपलब्ध आहे.

तसेच शासन निर्णय क्रमांक एफईडी/1096/2186/96/(270-98) माशि-8/मुंबई 32 दिनांक 3/2/1999 अन्वये विनाअनुदानित शिक्षण संस्थेतील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी ही सवलत लागू करण्यांत आली आहे. विनाअनुदानित शिक्षण संस्थेतील वैद्यकीय,अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी फक्त फ्री-सीट वर प्रवेश घेतलेल्या पाल्यांना आणि विना अनुदानित संस्थामधील इतर मान्यताप्राप्त सर्वसाधाारण अभ्यासक्रमासाठी ज्याकरीता प्रमाणित दराने फी आकारली जाते. अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले पाल्य यांना ही सवलत सन 1998-99 पासून लागू करण्यांत आली आहे.

सदर सवलत ही शिक्षकांच्या फक्त दोन कोणत्याही पाल्यांना अनुज्ञेय आहे.
स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्यांना शैक्षणिक सवलत शासन निर्णय शिक्षण व समाजकल्याण विभाग क्रमांक एमआयएस/ 1465 ह दि. 23/11/1965 अन्वये स्वातंत्र्य सैनिक यांची पत्नी, मुले, ( दत्तक व सावत्र धरुन ) व नातवंडे ( हयात नसलेल्या मुलांची मुले ) यांना शैक्षणिक सवलती दिल्या जातात.
त्यांचे दर खालील प्रमाणे आहेत.

इ.5 ते 7 शिष्यवृत्ती दर द.म.रु. 10/- पुस्तक अनुदान वार्षिक रु.20/-
इ.8 ते 11 शिष्यवृत्ती दर द.म.रु. 10/- पुस्तक अनुदान वार्षिक रु.40/-
इ.12 वी शिष्यवृत्ती दर द.म.रु. 40/- पुस्तक अनुदान वार्षिक रु. 50/-

पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम शिष्यृत्ती दर द.म.रु.50/- पुस्तक अनुदान वार्षिक रु. 100/-

वैद्य.अभियांत्रिंकी अभ्यासक्रम शिष्यवृत्ती दर द.म. रु.60/- पुस्तक अनुदान वार्षिक रु. 200/-
माध्यमिक पुस्तक पेढी योजना माध्यमिक शाळांतील इ. 5 वी ते 10 वी पर्यंतच्या अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच उपलब्ध करुन देण्यांत येत आहे.

विभाग - शिष्यवृत्ती योजना व शैक्षणिक सवलती

शैक्षणिक सवलती व शिष्यवृत्ती प्रकार
पात्रतेचे निकष
इयत्ता 10 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ( Non Plan )

ही योजना अनुदानित शाळेतील मुलांसाठी राबविली जाते. शासन निर्णय क्र. एफ.ई. डी. 1096/ प्र.क्र.1978/96 सशि-5 मंत्रालय, विस्तार भवन मुंबई 32 दि. 13/06/1996 नुसार राज्यातील माध्यमिक परंतू अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबविली जाते. त्याचे दर खालील प्रमाणे आहेत. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास शुल्क भरावे लागते.

1 ) इ. 5 वी रु. 3/-
2 ) इ. 6 वी रु. 4/-
3 ) इ. 7 वी रु. 5/-
4 ) इ. 8 वी रु. 6/-
5 ) इ. 9 वी रु. 7/-
6 ) इ. 10 वी रु. 8/-
वार्षिक दर ( एका सत्रासाठी )
प्रवेश फी वेगळी

सदर शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षांत 10 महिन्यांची मंजूर केली जाते. व त्यासाठी विद्यार्थ्यांची 75 % हजेरी व चांगली वर्तणूक यावर भर दिला जातो.

इ. 10 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
( Plan ) योजना
ही योजना विना अनुदानित शाळेतील मुलांसाठी राबविली जाते. शासन निर्णय क्र. क्र. एफ.ई. डी. 1096/ प्र.क्र.1978/96 सशि-5 मंत्रालय, विस्तार भवन मुंबई 32 दि. 13/06/1996 नुसार राबविली जाते. त्याचे दर खालील प्रमाणे आहेत.

1 ) इ. 5 वी रु. 42/-
2 ) इ. 6 वी रु. 42/-
3 ) इ. 7 वी रु. 42/-
4 ) इ. 8 वी रु. 92/-
5 ) इ. 9 वी रु. 92/-
6 ) इ. 10 वी रु. 92/-
वार्षिक दर ( दोन्ही सत्रासाठी )

सदर शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षांत 10 महिन्यांची मंजूर केली जाते. व त्यासाठी विद्यार्थ्यांची 75 % हजेरी व चांगली वर्तणूक असणे आवश्यक असते. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फी घेऊन त्याच व्ार्गात प्रवेश दिला जातो.
इ. 12 वी पर्यंत मुलांना मोफत शिक्षण

ही योजना अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थिनींसाठी लागू आहे. शासन निर्णय क्र. एफ.ई.डी.1084/(2568) साशि-5 मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई - 32 दि. 6 फेब्रु. 1987 सदर योजना राबविण्यासाठी 15 वर्षे रहिवासी असलेल्या पालकांच्या मुलींना देण्यात येते. 75 % शाळेत हजेरी असावी. अनुत्तीर्ण विद्यार्थींनीना फी भरावी लागते. त्याचे दर खालील प्रमाणे आहेत.

वार्षिक दर
अनुदानित
विना-अनुदानित
1 ) इ. 11 वी
रु. 54/-
रु. 272/-
2 ) इ. 12 वी
रु. 54/-
रु. 272/-

शैक्षणिक वर्षात विद्यार्थिनीला 10 महिन्यांची फी मंजूर केली जाते.

माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण

1 ) उच्च शिक्षण - अ
2 ) शालेय शिक्षण - ब

1 ) उच्च शिक्षण - अ
ही योजना अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. शासन निर्णय क्र. एफ.ई.डी. 1097/1569/(373/97) सशि- 5 दिनांक 21/4/1998 दिनांक 6/5/1998

सदर योजना अनुदानित व विना अनुदानित उच्च महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी राबविली जाते. त्यात व्यवसायिक शिक्षणाचा समावेश असल्याने विद्यार्थ्याची वर्षात 75% हजेरी व चांगली वर्तणूक असलेल्या विद्याथ्र्यांना पूर्ण फी भरावी लागते. त्याचे दर खालील प्रमाणे आहेत.

( उच्च शिक्षण )
( वार्षिक फी चे दर )
अभ्यासक्रम
अनु. दर
विनाअनु. दर
1 ) कला, विज्ञान, वाणिज्य
-------
400/-
2 ) बी. एड.
4000/-
8000/-
3 ) अभियांत्रिकी
4000/-
4000/-
4 ) वास्तूशास्त्र
4000/-
4000/-
5 ) बी. फॉर्म ( पदवी )
3000/-
3000/-
6 ) पॉलिटेक्निक
2500/-
4500/-
7 ) आर्किटेक पदविका
1450/-
1450/-
8) डी. फार्म्
1450/-
1450/-
9) औद्यो. संस्थेतील अभ्यासक्रम
180/-
1500/-

वाषिक फी चे दर
मा.शि. पाल्य ( उच्च्य शिक्षण )

अभ्यासक्रम
अनु. दर
विनाअनु. दर
1 ) शासकिय वैद्यकीय
6000/-
2 ) शासकिय दंत
4000/-
3 ) शासृ आयुर्वेद
3000/-
4 ) खाजगी वैद्यकीय
20000/-
5 ) खाजगी दंत
15000/-
6 ) खाजगी आयुर्वेद
3000/-
7 ) खाजगी होमिओफॅथिक
3000/-
8) निधी अनुदान
100/-
891/-
9) तंत्र
4500/-

2 ) शालेय शिक्षण - ब

इ 11 वी 12 वी च्या विर्द्याथ्यांसाठी ही सवलत देय आहे. त्यांचे फी चे दर खालील प्रमाणे आहेत.

1 ) कला
रु. 200/-
2) विज्ञान रु. 300/-
3 ) वाणिज्य रु. 200/-

सदर फी फक्त शैक्षणिक वर्षात 10 महिन्यांची मंजूर केली जाते.

ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 15,000/- चे आंत आहे अशांना फी माफी
1 ) अ उच्च शिक्षण

अ) उच्च शिक्षण

शासन परिपत्रक ( जी.आर.) क्र. एन.जी.सी./1995/28.12.96/अनुसुत्र मा.वि.-1/शिक्षण संचालनालय, म.रा. पुणे -1 ( उच्च शिक्षण ) दिनांक 29/6/1996 नुसार ही योजना राबविली जाते.

सदर योजनेचे निकष - विद्यार्थ्यांची 75 % शाळेत उपस्थिती, त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 15,000/- चे आंत असल्याबाबत म. तहसिलदार यांचा दाखला, विद्यार्थ्यांची चांगली वर्तणूक यावर ही योजना अवलंबून आहे. त्यासाठी शासनाने शालेय व उच्च शिक्षणाचे दर खालील प्रमाणे लागू केले आहेत.

उच्च शिक्षण ( वार्षिक फीचे दर )
(10 महिन्यासाठी )
प्रयोगशाळा फी
125/-
ग्रंथालय फी
10/-
जिमखाना फी
20/-
इतर फी
15/-
एकुण
170/-
ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 15,000/- चे आंत आहे अशांना फी माफी
2 ) ब शालेय शिक्षण
ब) शालेय शिक्षण

( 10 महिन्याचे फीचे दर )
( 11 वी /12 वी मुले )
अनु. दर
विनाअनु. दर
11 वी
118/-
240/-
12 वी
124/-
272/-6
आजी माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती

शासन निर्णय क्र. एन.डी.एफ.1094/1668/94/ साशी- मंत्रालय, विस्तार भवन मुंबई - 32 दिनांक 139/1994

सदर शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना पुस्तक अनुदान, गणवेश अनुदान, शिष्यवृत्ती व विद्यावेतन दिले जाते. याचे दर खालील प्रमाणे आहेत.

(सुधारीत दर )
( वार्षिक दर )
इ. 1 ली ते 4 थी
60/-
इ. 5 वी ते 7 वी
60/-
इ. 8 वी ते 10 वी
80/-
इ. 11 वी 12 वी
100/-

प्रमाणपत्र ( दरमहा )
पदविका ( दरमहा )

सदर कामी जिल्हा सैनिक अधिकारी यांचे प्रमाणपत्र व विद्यार्थ्यांचे प्रगती अहवाल व 75% उपस्थिती तपासून फी मंजूर केली जाते.